आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडियाचा कोच कोण:टी-20 विश्वचषकानंतर कुंबळे किंवा लक्ष्मण प्रशिक्षक होऊ शकतात; बीसीसीआयने महेला जयवर्धनेशी संपर्क साधला होता

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

टी-20 विश्वचषकानंतर कोच रवी शास्त्रींच्या जागी अनिल कुंबळे किंवा व्हीव्हीएस लक्ष्मण टीम इंडियाचे प्रशिक्षक बनू शकतात. टी-20 विश्वचषकानंतर रवी शास्त्रींचा कार्यकाळ संपत आहे. यापुढे या पदावर राहण्यास त्यांनी नकार दिला आहे.

वृत्तसंस्थेने BCCI (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) च्या हवाल्याने म्हटले आहे की, टीम इंडियाच्या नवीन प्रशिक्षकासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण आणि अनिल कुंबळे यांच्याशी संपर्क साधला जात आहे. त्याचबरोबर मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा केला जात आहे की, या दोघांपूर्वी मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनाही टीम इंडियाचे प्रशिक्षक बनण्यासाठी संपर्क करण्यात आला होता.

कुंबळेची दावेदारी मजबूत
रवी शास्त्री प्रशिक्षकपदावरून गेल्यानंतर टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक असलेले अनिल कुंबळे यांची दावेदारी मजबूत मानली जात आहे. यापूर्वी 2016 मध्ये कुंबळे यांची भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी 2017 मध्ये या पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता. असे मानले जात होते की, भारतीय कर्णधार कोहलीशी मतभेद झाल्याने कुंबळेने आपल्या पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता.

कुंबळे यांनी राजीनाम्यात म्हटले होते की, कोहलीला त्याच्या पद्धतींवर आक्षेप असल्याने आश्चर्य वाटले. कुंबळे म्हणाले होते की, बीसीसीआयने त्यांच्या आणि कोहलीमधील मतभेद दूर करण्याचा प्रयत्न केला होता. अहवालानुसार, विराटने टी -20 विश्वचषकानंतर टी -20 कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीत आता अनिल कुंबळेला पुन्हा जबाबदारी दिली जाऊ शकते.

गांगुलीची कुंबळे प्रशिक्षक म्हणून कायम राहवे अशी इच्छा होती
2017 मध्ये, जेव्हा कुंबळेने पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला, तेव्हा कोहलीने रवी शास्त्री कुंबळेच्या जागी असावेत याला समर्थन दिले होते. अहवालानुसार, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीला कुंबळे प्रशिक्षक म्हणून कायम राहावे अशी इच्छा होती. गांगुली त्यावेळी क्रिकेट सुधार समितीचे सदस्य होते. या समितीमध्ये व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सचिन तेंडुलकर हेही सदस्य होते. कुंबळेलाही त्यांचा पाठिंबा होता. आता पुन्हा एकदा बीसीसीआय कुंबळेला प्रशिक्षक म्हणून परत आणण्याचे मार्ग शोधत आहे. अहवालानुसार, कुंबळे यांना यासाठी संपर्क साधण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...