आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वनडे क्रिकेट:सुमार फलंदाजीने टीम इंडिया सलामीला पराभूत, बांगलादेश संघ विजयी; बुधवारी दुसरा वनडे

ढाका2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाकिब हसन (५/३६) आणि हुसेनने (४/४७) यजमान बांगलादेश संघाला रविवारी घरच्या मैदानावर बलाढ्य टीम इंडियाविरुद्ध विजय मिळवून दिला. सुमार फलंदाजीमुळे राेहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला सलामीला लाजिरवाण्या पराभवाला सामाेरे जावे लागले. बांगलादेश संघाने १ विकेटने सलामीचा वनडे सामना जिंकला. यासह बांगलादेश संघाने तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. मालिकेतील दुसरा वनडे सामना बुधवारी मीरपूरच्या मैदानावर रंगणार आहे.

भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ४१.२ षटकांत १८६ धावांवर आपला डाव गुंडाळला. प्रत्युत्तरात बांगलादेशने ४६ षटकांत ९ गड्यांच्या माेबदल्यात विजयश्री खेचून आणली.

ऋषभ बाहेर; राहुल यष्टिरक्षक गंभीर दुखापतीमुळे यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतला मालिकेतून बाहेर पडावे लागले. त्यामुळे आता लाेकेश राहुलला यष्टिरक्षकाच्या भूमिकेची संधी देण्यात आली. ऋषम कसाेटी मालिकेत खेळू शकेल.

बातम्या आणखी आहेत...