आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Sports
 • Cricket
 • India Vs Shri Lanka Latets Update | Team India Lost To Sri Lanka, Indian Team Almost Out Of The Tournament, Rohit Breaks Sachin's Record

आशिया कप:श्रीलंकेविरुद्ध टीम-इंडिया पराभूत; भारतीय संघ स्पर्धेतून जवळपास बाहेरच, रोहितने माेडला सचिनचा विक्रम

दुबई23 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक

आशिया चषक स्पर्धेत भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना श्रीलंकेने ६ गडी राखून जिंकला. याचबरोबर भारताचे या स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. टीम इंडियाने २० षटकांत ७ विकेट गमावून १७३ धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेने १९.५ षटकांत ४ गडी गमावून १७४ धावा केल्या.

भारतातर्फे युझवेंद्र चहलने ३ आणि अश्विनने १ बळी घेतला. भारतीय संघासाठी रोहित शर्माने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ४१ चेंडूत ७२ धावांची खेळी केली. त्याचवेळी सूर्यकुमार यादवनेही ३४ धावा केल्या. श्रीलंकेकडून दिलशान मदुशंकाने शानदार गोलंदाजी करत २४ धावांत ३ बळी घेतले. दासून शनाका आणि चमिका करुणारत्नेने २-२ विकेट घेतल्या.

रोहित आणि सूर्या यांच्यात ५८ चेंडूत ९७ धावांची भागीदारी झाली. सामन्यात हार्दिक पांड्या आणि दीपक हुड्डाही फ्लॉप ठरले. हार्दिक १३ आणि हुड्डा केवळ ३ धावा करू शकले. गेल्या सामन्यात खराब शॉट खेळून बाद झालेला ऋषभ पंत श्रीलंकेविरुद्ध फार काही करू शकला नाही आणि १३ चेंडूत १७ धावा करून बाद झाला.

लंकेविरुद्ध के. एल. राहुल पुन्हा एकदा फ्लॉप झाला. त्याने ७ चेंडूंचा सामना केला आणि केवळ ६ धावा केल्या. त्याची विकेट महेश तिक्षाने घेतली. दुसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर राहुलला पुढे जाऊन खेळायचे होते, पण चेंडू जाऊन त्याच्या पायाला लागला. जोरदार अपील होताच अंपायरने त्याला एलबीडब्ल्यू आऊट दिला.

स्पर्धेत टिकून राहण्यासाठी भारताला आता काहीतरी चमत्कारच हवा

 • भारताने शेवटच्या सुपर-४ सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव करावा लागेल. मात्र, भारतीय खेळाडूंना यासाठी प्रचंड नव्या ताकदीने मैदानात उतरावे लागेल.
 • पाकिस्तानचा संघ या स्पर्धेत एक ताकदवान संघ म्हणून उदयाला आला आहे. या संघाने श्रीलंकेचा पराभव करायला हवा.
 • अफगाणिस्तान संघानेही पाकिस्तानचा पराभव करायला हवा.
 • यानंतर श्रीलंका ६ गुणांसह पहिल्या क्रमांकावर राहील.
 • भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे प्रत्येकी दोन गुण होतील. या तिन्ही संघांमध्ये भारताचा निव्वळ धावगती सर्वोत्तम असणे आवश्यक आहे.
 • 2500 धावा रोहितने वेगवान गोलंदाजांविरुद्ध केल्या आहेत. टी-20मध्ये अडीच हजार धावा पूर्ण करणारा तो पहिला खेळाडू आहे.
 • 33 व्यांदा विराट कोहली शून्यावर बाद झाला. भारताकडून सर्वाधिक डक केलेल्या खेळाडूंत तो सहाव्या क्रमांकावर आहे.

रोहितच्या नावे नवे विक्रम

या खेळीदरम्यान रोहित आशिया कपमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने सचिन तेंडुलकरचा ९७१ धावांचा विक्रम मोडला. याशिवाय, तो टी-२० मध्ये प्रथम फलंदाजी करताना १०२ षटकार ठोकणारा खेळाडू ठरला आहे. रोहित शर्माने ३२ वेळा टी-२० मध्ये सर्वाधिक ५०+ धावा करण्यात कोहलीची बरोबरी केली आहे. रोहितने ५ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ७२ धावांची खेळी केली.

पाकिस्तानचे वेगवान आणि अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज यांच्यात आज सामना

शारजाह | आशिया चषकाच्या सुपर-४ मध्ये बुधवारी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील हा सामना वेगवान गोलंदाज विरुद्ध फिरकी गाेलंदाजीच्या सामन्याचा अनुभव देईल. अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज मुजीब उर रहमानने तीन सामन्यांत ५.८३ च्या सरासरीने ७ विकेट घेतल्या आहेत. तो त्याच्या संघाचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे, तर राशिद खाननेही याच सामन्यात ६.०८ च्या इकॉनॉमीने ४ बळी घेतले आहेत आणि तो त्याच्या संघाचा दुसरा यशस्वी गोलंदाज आहे. त्याचबरोबर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाह सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. त्याने तीन सामन्यांत ७.९० च्या इकॉनॉमीने पाच विकेट्स घेतल्या आहेत. नसीम शाहने भारतीय संघाविरुद्धच्या दोन्ही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली. पहिल्या सामन्यात त्याने २७ धावांत दोन बळी घेतले होते, तर भारतीय संघाविरुद्ध सुपर-४ मध्ये ४५ धावांत एक विकेट घेतली होती.

बातम्या आणखी आहेत...