आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सलगच्या अपयशातून सावरलेला भारतीय संघ आता यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेतील आपल्या पराभवाची हॅट्ट्रिक टाळण्यासाठी सज्ज झाला आहे. तिसऱ्या वनडेत बाजी मारून मालिकेचा शेवट गाेड करण्याचा टीमचा प्रयत्न असेल. याशिवाय भारतीय संघ विदेश दाैऱ्यामध्ये सलग दुसऱ्यांदा क्लीन स्वीपची मालिका राेखण्यासाठी उत्सुक आहे. याच इराद्याने टीम इंडिया आज बुधवारी कॅनबेराच्या मैदानावर उतरणार आहे. आज भारत आणि यजमान ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा वनडे सामना रंगणार आहे. क्लीन स्वीपला राेखण्याची भारतीय संघाला आता ही शेवटची संधी आहे. त्यामुळे यात बाजी मारण्यासाठी टीममध्ये बदल हाेण्याची शक्यता आहे. यासाठी नवदीप सैनीच्या जागी भारतीय संघात युवा गाेलंदाज टी.नटराजन किंवा शार्दूल ठाकूरला संधी मिळण्याचे चित्र आहे. यंदा सत्राच्या सुरुवातीला जानेवारी-फेब्रुवारीत भारताचा न्यूझीलंड दाैऱ्यातील मालिकेत ०-३ ने सुपडा साफ झाला हाेता. आता सलगच्या दाेन विजयांसह ऑस्ट्रेलियाने २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे तिसऱ्या विजयाकडे ऑस्ट्रेलियाची नजर आहे.
यजमानांची आघाडीची फळी सरस; भारताच्या गाेलंदाजांसमाेर आव्हान
फलंदाजीच्या आघाडीच्या फळीच्या सरस खेळीमुळेच यजमान ऑस्ट्रेलिया संघाला मालिका विजयाचे घवघवीत यश संपादन करता आले. कर्णधार फिंचसह डेव्हिड वाॅर्नरने दर्जेदार कामगिरीमध्ये सातत्य ठेवताना यजमानांना मालिका विजय मिळवून दिला. त्यामुळे भारतीय गाेलंदाजांसाठी हे दाेन्ही सामने आव्हानात्मक हाेते. मात्र, याच मैदानावर आॅस्ट्रेलियन गाेलंदाजांनी स्वत:ला सिद्ध करताना टीम इंडियाच्या फलंदाजांना स्वस्तात बाद केले.
गंभीर दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाचा फाॅर्मात असलेला डेव्हिड वाॅर्नर आणि गाेलंदाज पॅट कमिन्सला विश्रांती देण्यात आली. त्यामुळे हे दाेघेही आज तिसऱ्या वनडे सामन्यात खेळणार नाही. याशिवाय टी-२० मालिकेतूनही हे दाेघे बाहेर झाले. या दाेघांच्या गैरहजेरीचा टीम इंडियाला माेठा फायदा हाेण्याची शक्यता आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.