आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आयपीएलमधील उल्लेखनीय कामगिरीनंतर आता टीम इंडियाचे खेळाडू आॅस्ट्रेलिया दाैऱ्यामध्ये चमकण्यासाठी सज्ज झाले आहेत. यासाठी भारतीय संघ सिडनीमध्ये दाखल झाला आहे. येत्या २७ नाेव्हेंबरपासून भारत आणि यजमान आॅस्ट्रेलिया यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात हाेईल. या दाैऱ्यात संघ वनडे, टी-२० आणि कसाेटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारतीय क्रिकेट संघ सध्या सिडनी ऑलिम्पिक पार्कच्या पुलमॅन हॉटेलमध्ये क्वॉरंटाइन आहे. न्यू साऊथ वेल्सच्या सरकारने भारतीय संघाला क्वॉरंटाइनदरम्यान सराव करण्यास परवानगी िदली.
टीम इंडियाच्या खेळाडूंनी शनिवारी जिम व धावण्याचा सराव केला. बीसीसीआयने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर ऋषभ पंतचे एक छायाचित्र पोस्ट केले, ज्यात तो सायकलिंग करतोय. दुसरीकडे, वरुण चक्रवर्तीच्या जागी संघात स्थान मिळालेला टी. नटराजन डंबेल्ससोबत दिसला. कसोटीतज्ञ चेतेश्वर पुजारादेखील घाम गाळताना दिसतोय. बीसीसीआयने लिहिले की, ‘विमानातून उतरल्यानंतर दोन दिवसांनी भारतीय टीमने आज पहिल्यांदा सराव केला. शरीराच्या हालचालीसाठी धावण्याचा सराव केला. “ युजवेंद्र चहलनेदेखील कुलदीप यादवसोबत आपले एक छायाचित्र शेअर केले. टीम येथे तीन सामन्यांची वनडे आणि तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळेल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.