आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Team India Ready For Day night Test; "Continuity Is The Key To Success," Kohli Said During Training, News And Updates In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तिसऱ्या सामन्याची तयारी:डे-नाईट कसोटीसाठी टीम इंडिया सज्ज; कोहली प्रशिक्षणादरम्यान म्हणाला, 'सातत्य हीच यशाची गुरुकिल्ली'

अहमदाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कर्णधार विराट कोहलीने डे-नाईट कसोटी सामन्यासाठी सराव करताना जोरदार घाम गाळला

भारत आणि इंग्लंड संघादरम्यान सध्या कसोटीचे सामने सुरू आहेत. 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना हा 24 फेब्रुवारी रोजी अहमदाबादच्या मोटेरा स्टेडिअमवर खेळला जाईल. भारतीय संघाचा हा तिसरा डे-नाईट कसोटी सामना असून यासाठी कर्णधार विराट कोहली आणि संघाने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याचबरोबर भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवला फिटनेससाठी 1-2 दिवस द्यावे लागणार आहे.

कर्णधार कोहलीने मैदानात जोरदार सराव केला. त्याने वेट ट्रेनिंग करताना सोशल मीडियावर 'सात्यत हीच यशाची गुरुकिल्ली' असे लिहीत एक फोटो शेअर केला.

मोटेरामध्ये सिरीजच्या शेवटच्या दोन मालिका

भारत आणि इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यामध्ये दोन्ही संघ 1-1 ने बरोबरीत आहेत. सिरीजच्या शेवटच्या महत्वाच्या दोन्ही मालिका हे अहमदाबादमधील मोटेरा स्टेडीअममध्ये खेळल्या जाणार आहेत. यासाठी दोन्ही संघ गुरुवारी मोटेरामध्ये पोहचले. भारत आणि इंग्लंड संघाकडून शेवटच्या दोन्ही सामन्यासाठी आप-आपले संघ घोषित करण्यात आले आहेत.

उमेशला फिटनेस टेस्ट पूर्ण करावी लागेल

उमेश यादवची शार्दूल ठाकूरच्या जागेवर निवड करण्यात आली आहे. परंतु, उमेश यादव फिटनेस टेस्ट उत्तीर्ण झाल्यानंतरच संघात सामील होऊ शकतो. ही टेस्ट एक-दोन दिवसांत होऊ शकते. याव्यतिरिक्त भारतीय संघात जसप्रीत बुमराह आणि इंशात शर्मा आदी वेगवान गोलदांजाचा समावेश आहे.

मोटेरामध्ये कसोटी सामना खेळण्यात मजा येईल - कुलदीप

भारतीय संघाचा स्पिनर कुलदीप यादवने संघासोबत स्टेडीअमचा फोटो शेअर केला. त्यांने लिहिले की, "मोटेरा, एक भव्य स्टेडियम असून निर्मात्याने याचे विलक्षण काम केले आहे. खूप चांगल्या सुविधा दिल्या जात आहे. येथे सामने खेळण्यास मजा येईल."

बेन स्टोक्सने मैदानाचे 2 व्हिडिओ शेअर केले

इंग्लंड संघानेदेखील मोटेरा मैदानात सराव सुरू केला असून संघाचा ऑलराऊंडर बेन स्टोक्सने मैदानाचे 2 व्हिडिओ शेअर केले आहेत. पहिल्या व्हिडिओत संघाचे सर्व खेळाडू सराव करताना आणि धावाताना दिसत आहेत. दुसऱ्या व्हिडिओमध्ये सराव झाल्यानंतर सर्व खेळाडू ड्रेसिंग रूमकडे जाताना दिसून आले.

बातम्या आणखी आहेत...