आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतसह भारतीय संघातील 2 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. दरम्यान, यामधील एका खेळाडूचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहे. तर दुसरीकडे, ऋषभ पंत आयसोलेशनमध्ये असून त्यांचा 18 जुलै रोजी कोरोनाची चाचणी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे पंतमध्ये कोरोनाचे कोणतेच लक्षण नाहीये.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, ऋषभ पंतचे कोरोना अहवाल 10 जुलै रोजी पॉझिटिव्ह आले होते. त्यापूर्वी पंत 29 जून रोजी यूरो कपचे मॅच पाहायला गेले होते. पंत वितिरिक्त हनुमा विहारी आणि जसप्रीत बुमराहदेखील मॅच पाहायला होते.
ऋषभ पंत पॉझिटिव्ह आल्यानंतर भारतीय संघाचे कोच रवि शास्त्री 11 जुलै रोजी विम्बल्डन फायनल पाहायला पोहोचले होते. तर दुसरीकडे भारतीय संघाचे इतर खेळाडूदेखील कुटुंबियांसोबत सुट्टी साजरी करत आहे. सर्व खेळाडूंना कोरोनाचे एक डोस देण्यात आले आहे. तर दुसरे डोस इंग्लंडमध्ये देण्यात येणार आहे.
भारतीय संघ लंडनमध्ये साजरी करत आहे सुट्टी
कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा आपल्या कुटुंबियांसोबत इंग्लंडमध्ये पोहोचले आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप झाल्यापासून भारतीय संघ लंडनमध्ये आपल्या कुटुंबियांसोबत सुट्टी साजरी करत आहे. बीसीसीआय अधिकार्यांच्या माहितीनुसार, हे खेळाडू काही दिवसांपूर्वी गर्दीच्या ठिकाणी पाहायला मिळाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.