आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय संघ जुलैमध्ये श्रीलंकेचा दौरा करणार आहे. तेथे टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळली जाईल. परंतु या दोन मालिकांमध्ये इंग्लंड दौर्यासाठी निवडलेल्या खेळाडूंचा समावेश होणार नाही, कारण भारतीय संघ जूनमध्ये न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड कसोटी मालिकेचा अंतिम सामना खेळल्यानंतर इंग्लंडमध्येच राहणार असून ऑगस्टमध्ये इंग्लंडबरोबर होणाऱ्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेची तयारी करेल.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले की, "आम्ही जुलै महिन्यात सिनिअर पुरुष संघासाठी व्हाईट बॉल सिरीजची योजना तयार केली आहे. संघ श्रीलंकेत एकदिवसीय आणि टी-20 सामने खेळणार आहे. एकदिवसीय आणि टी-20 साठी स्वतंत्र संघ तयार केला जाईल. यात इंग्लंड दौर्यासाठी कसोटी मालिकेची तयारी करणाऱ्या खेळाडूंचा समावेश केला जाणार नाही.
भारतीय संघाचा इंग्लंड दौरा 14 सप्टेंबरला संपेल
भारतीय संघ 18 ते 22 जून दरम्यान वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपचा अंतिम सामना खेळणार आहे. त्याचबरोबर ऑगस्टमध्ये इंग्लंडबरोबर पाच कसोटी सामन्यांची मालिका आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघ इंग्लंडमध्ये थांबून मालिकेची तयारी करेल. भारतीय संघाचा इंग्लंड दौरा 14 सप्टेंबरला संपेल.
श्रीलंकेत 5 टी -20 आणि तीन एकदिवसीय सामन्याची सिरीज
श्रीलंका दौर्याचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही, परंतु असे मानले जात आहे की, संघ तिथे 5 टी -20 आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळू शकेल. ऑक्टोबरमध्ये होणार्या टी -20 विश्वचषक होण्यापूर्वी खेळाडूंनी तयार राहावे, अशी बीसीसीआयची इच्छा आहे. कारण इंग्लंड दौर्यावर भारतीय संघाला फक्त पाच कसोटी सामने खेळायचे आहेत. अशा परिस्थितीत इंग्लडविरुद्ध च्या टेस्ट सिरीजमध्ये समावेश नसलेले व्हाईट बॉलचे स्पेशलिस्ट शिखर धवन, हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, युझवेंद्र चहल हे खेळाडू विश्वचषक होण्यापूर्वी सज्ज असावेत.
तरुण खेळाडूंना संधी मिळू शकते
बीसीसीआयच्या एका सूत्रानुसार, श्रीलंका दौर्यावर वनडे आणि टी -20 मालिकेसाठी युवा खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते, कारण इंग्लंड दौर्यावर व्यस्त असल्यामुळे रोहित शर्मा, विराट कोहलीसह अनेक अव्वल खेळाडू संघात नसतील. अशा परिस्थितीत बीसीसीआय युवा खेळाडूंना विश्वचषक होण्यापूर्वी संधी देऊ शकते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.