आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीलंकेविरुद्ध आता ही असेल रणनीती:टीम इंडियाला बदलावा लागेल दृष्टिकोन, जडेजाअभावी फलंदाजीही कमकुवत

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आशिया चषक स्पर्धेसाठी भारताने केवळ तीन वेगवान गोलंदाजांची निवड केल्याने अनेक अडचणींचा सामाना करावा लागतो आहे. त्यामुळे भारतीय संघ निवडीसाठी संघर्ष करतो आहे. आवेश खान जास्त धावा देतो आणि सध्या तो आजारी आहे. अर्शदीप सिंग खराब क्षेत्ररक्षणामुळे वादात सापडला आहे. अनुभवी भुवनेश्वर कुमारने १९व्या षटकात अनेक धावा दिल्या. त्यामुळे कर्णधार आणि प्रशिक्षक हतबल झाले आहेत. रवींद्र जडेजा स्पर्धेतून बाहेर पडल्याने फलंदाजीही कमकुवत दिसते आहे. पाकविरुद्ध सूर्यकुमार यादव, हार्दिक आणि ऋषभ पंत यांची विकेट लवकर गमावल्याने भारतीय संघाच्या धावसंख्येचा वेग मंदावला. परिणामी, विराट कोहलीचीही खेळण्याची गती कमी झाली. त्याच्या मदतीसाठी आलेला हुड्डा हा फलंदाज उरला होता. हुड्डानंतर फक्त गोलंदाज उरले होते.

भारत किती काळ टी-२० क्रिकेटमध्ये हाच अॅप्रोच ठेवून खेळत राहील. हे समजण्यापलीकडचे आहे. आमचे फलंदाज गोलंदाजी करू शकत नाहीत आणि गोलंदाज फलंदाजी करू शकत नाहीत. फक्त हार्दिकच असा आहे ज्याने गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्हीमध्ये प्रभुत्व मिळवले आहे. वर्षाच्या सुरुवातीला भारताविरुद्ध श्रीलंकेची कामगिरी अत्यंत खराब झाली होती. पण आता त्याच्या खेळात खूप बदल झाला आहे. कोहली फॉर्ममध्ये असला तरी तो ज्या गतीने धावा करत आहे त्यात सुधारणा होऊ शकते. तथापि, एक गोष्ट आहे जी बदलत नाही आणि ती म्हणजे ऋषभ पंतची फलंदाजी. तो ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहे, त्यामुळे त्याला संघात राहणे कठीण जात आहे. मंगळवारी श्रीलंकेविरुद्ध दिनेश कार्तिक व अश्विनला संघात परत आणण्याची वेळ आली आहे. डीके श्रीलंकेविरुद्ध वेगवान खेळतो आणि या संघाविरुद्ध त्याचा स्ट्राइक रेट १५०+ आहे.

लंकेविरुद्ध अक्षर पटेलला मिळू शकते संधी... जडेजाच्या जागी आलेल्या अक्षर पटेलला श्रीलंकेविरुद्ध संधी मिळू शकते. हुड्डाला रोहितने गोलंदाजी करू दिली नाही. अक्षरही फलंदाजीही करतो. त्यामुळे हुड्डाच्या जागी अक्षरचा समावेश केला जाऊ शकतो. असं असलं तरी दुबईच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना फारसं यश मिळत नाहीये. अशा परिस्थितीत त्याचा समावेश करून संघ फिरकी गोलंदाजीचे पर्याय वाढवू शकतो. बिष्णोईचे खेळणे निश्चित आहे. त्याने पाकचा कर्णधार बाबर आझमची घेतलेली विकेट लक्षणीय होती.

बातम्या आणखी आहेत...