आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेट:SENA मध्ये टीम इंडियाची दैना, दहा वर्षांत पाक-श्रीलंका विदेश दाैऱ्यात वरचढ; भारतीय संघ अपयशी

मेलबर्न7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • SENA म्हणजे दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड व आॅस्ट्रेलिया

यजमान आॅस्ट्रेलियाविरुद्ध सलामीच्या कसाेटी सामन्यातील टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव आता चांगलाच चर्चेत आला. याशिवाय याच सुमार खेळीमुळे टीम इंडियाच्या कामगिरीवरही आता प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. एकूणच भारतीय संघाला या पराभवाने माेठ्या टीकेला सामाेरे जावे लागत आहे. भारतीय संघाला विदेश दाैऱ्यात अद्याप आपली छाप पाडता आली नाही. त्यामुळे टीम इंडियाही गत दहा वर्षांत SENA म्हणजेच दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया दाैऱ्यात अपयशी ठरली. या दाैऱ्यात भारताने ३७ सामन्यांत नशीब आजमावले. भारताला १३ टक्के विजय संपादन करता आले. आशियातील पाक व श्रीलंकेला भारताच्या तुलनेत विदेश दाैऱ्यावर उल्लेखनीय कामगिरी करता आली. पाकने सर्वाधिक १७ आणि श्रीलंकेने १५ टक्के विजय नाेंदवले.

देशांतर्गत स्पर्धेत पाकमध्ये ६, भारतात ३८ संघ खेळतात
आशियातील इतर देशांच्या तुलनेत भारतातील क्रिकेटच्या सुविधा अधिक व नियोजन पद्धत चांगल्या आहेत. ३८ संघांची एलिट व प्लेट गटात विभागणी केली. प्रथम श्रेणी, एकदिवसीय व टी-२० तिन्ही क्रिकेटमध्ये त्यांना संधी मिळते. त्याच्या चांगल्या व वाईट दोन्ही बाजू आहेत. सर्व संघांना संधी मिळते. त्याला चांगली गोष्ट म्हणता येईल. अनेक सामन्यांत मोठ्या संघासमोर कमजोर संघ येतात. त्याला खराब बाब म्हणता येईल. दुसरीकडे, पाकिस्तानचा विचार केल्यास गेल्या सत्रात पद्धत बदलली आहे. आता १६ ऐवजी केवळ ६ संघ प्रथम श्रेणी स्पर्धेसह एकदिवसीय व टी-२० मध्ये उतरतात. पाकचे प्रधानमंत्री व माजी कर्णधार इम्रान खानने त्यात लक्ष्य घातले आणि संघांची संख्या कमी करण्यास सांगितले होते.

२२ डावांत टीमची ठरली सुमार कामगिरी
गत दहा वर्षांत भारताला ७३ पैकी २२ डावांत धावसंख्येचा २०० चा आकडाही गाठता आला नाही. आता शनिवारी सलामी कसाेटीच्या दुसऱ्याच डावात भारताने ३६ धावांत गाशा गुंडाळला. याशिवाय २०१४ मध्ये भारताचा इंग्लंडविरुद्ध सामन्यात ९४ धावांवर खुर्दा उडाला हाेता. यादरम्यान भारताने एकूण १२ मालिका खेळल्या. यातील ९ मालिकेत भारताचा पराभव झाला.

वर्ल्ड चॅम्पिनयशिपचा फायनल प्रवेश खडतर
भारतीय संघाला यंदाच्या सत्रात एकाही कसाेटीत विजय संपादन करता आला नाही. त्यामुळेच भारताचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधील प्रवेश आता अडचणीचा ठरला. भारताचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे हे स्थान कायम ठेवण्याचे माेठे आव्हान टीमसमाेर आहे.

काेहली सर्वात यशस्वी फलंदाज; ईशांत एकमेव बळींचा शतकवीर
भारताचा कर्णधार विराट काेहलीने सर्वाधिक ३२ कसाेटीत २८८९ धावा काढल्या. त्याच्या नावे ११ शतकांसह १० अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने यासह काेहली हा सर्वात यशस्वी फलंदाज ठरला. त्यानंतर काेणताही फलंदाज २ हजार धावांचा आकडा गााठू शकला नाही. पुजाराच्या २७ सामन्यांत १८०७, रहाणेच्या नावे २६ सामन्यांत १७३३ धावांची नाेंद आहे. गाेलंदाजीमध्ये ईशांत शर्माचा दबदबा आहे. ताे बळींचे शतक साजरे करणारा एकमेव गाेलंदाज आहे. हा पल्ला त्याने ३० सामन्यांतून गाठला.

बातम्या आणखी आहेत...