आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सराव:टीम इंडियाचे आयपीएलपूर्वी अहमदाबादमध्ये सराव शिबिर; 26 खेळाडूंचा असेल सहभाग

अहमदाबाद/दुबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बायाे-सिक्युअर स्टेडियममध्ये 60 जणांना राहण्याची व्यवस्था

जगातील सर्वात माेठ्या क्रिकेट स्टेडियम माेटेरामध्ये भारतीय संघ आगामी दाैऱ्यासाठीचा सराव करणार आहे. यासाठीच जगातील हे भले माेठे क्रिकेट मैदान उघडल्या जाईल. आयपीएलच्या आयाेजनापूर्वीच भारतीय संघाचा या मैदानावर ट्रेनिंग कॅम्प लागण्याची शक्यता आहे. यादरम्यान बायाे-सिक्युअर अशा सुरक्षित वातावरणात हे सराव शिबिर आयाेजित हाेईल. यामध्ये टीम इंडियाच्या २६ खेळाडूंना सहभागी करण्यात येईल. यासाठी बीसीसीआयने याेजना आखली आहे. दुसरीकडे पहिल्यांदाच जगातील सर्वात माेठ्या स्टेडियमवर क्रिकेट खेळी अधिक जाेमाने सक्रिय हाेणार आहे.

सरदार पटेल स्टेडियमवर आॅस्ट्रेलिया दाैऱ्याच्या तयारीसाठी शिबिर आयाेजित केले जाईल. यासाठी निवड झालेले २६ खेळाडू हे आयपीएलमध्येही सहभागी हाेतील. त्यानंतर या खेळाडूंना डिसेंबर-जानेवारीदरम्यान आॅस्ट्रेलियाचा दाैरा करावा लागणार आहे.

आयाेजनाचे लेखी पत्र मिळाले : ईसीबीचा दुजाेरा, बीसीसीआय केंद्र सरकारच्या परवानगीच्या प्रतीक्षेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) यंदाच्या १३ व्या सत्रातील आयपीएलचे आयाेजन करण्यासाठी एमिरात क्रिकेट मंडळाला (ईसीबी) लेखी स्वरूपात पत्र लिहिले. याच वृत्ताला आता ईसीबीचे सचिव मुबाशिर उस्मानी यांनी दुजाेरा दिला. ‘आम्हाला आयपीएल आयाेजनासाठीचे पत्र मिळाले आहे. या लीगच्या आयाेजनासाठी उत्सुक आहाेत. आता भारत सरकारच्या निर्णयाची वाट पाहत आहाेत, असे उस्मानी यांनी सांगितले. अद्याप बीसीसीआयला भारत सरकारकडून लीगच्या विदेशातील आयाेजनासाठीची परवानगी मिळालेली नाही.

८०० काेटींच्या स्टेडियममध्ये चार ड्रेसिंग रूम
माेटेरा स्टेडियम जवळपास ६३ एकरावर बांधण्यात आले आहे. यासाठी अंदाजे ८०० काेटींचा खर्च झालेला आहे. या सर्वात माेठ्या स्टेडियममध्ये चार ड्रेसिंग रुम्स आहेत. याशिवाय ५५ कॅमेराचे क्लब हाऊस आहे. क्लब हाऊसमध्ये स्वीमिंग पुल, एक थ्री-डी प्राेजेक्टर, टेनिस, टेबल-टेनिस, बॅडमिंटन व स्क्वॅश खेळण्याची सुविधा देखील आहे.