आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Team India's Series Win; Samson Man Of The Match; Tomorrow Is The Third ODI Of The Series | Marathi News

वनडे मालिका:टीम इंडियाचा मालिका विजय, सॅमसन सामनावीर; उद्या मालिकेतील तिसरा वनडे

हरारे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

युवा गाेलंदाज शार्दूल ठाकूर (३/३८) आणि सामनावीर संजू सॅमसनने (नाबाद ४३) भारतीय संघाला वनडे मालिका विजय मिळवून दिला. लाेकेश राहुलच्या कुशल नेतृत्वाखाली टीम इंडियाने शनिवारी दुसऱ्या वनडे सामन्यात यजमान झिम्बाव्वे संघाला धूळ चारली. भारतीय संघाने २५.४ षटकांत पाच गड्यांनी सामना जिंकला. यासह फाॅर्मात असलेल्या भारतीय संघाला तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेता आली. उद्या साेमवारी याच मैदानावर मालिकेतील तिसरा व शेवटचा वनडे सामना हाेणार आहे. यादरम्यान टीम इंडिया विजयी हॅट््ट्रिकच्या इराद्याने या मैदानावर उतरणार आहे. भारतविरुद्ध सलग सातवी वनडे मालिका गमावणारा झिम्बाव्वे संघ आता शेवट गाेडसाठी प्रयत्नशील राहिल.

नाणेफेक जिंकून गाेलंदाजी करताना भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करणाऱ्या झिम्बाव्वेचा डाव ३८.१ षटकांत अवघ्या १६१ धावांवर गुंडाळला. प्रत्युत्तरात भारताने आवाक्यातले विजयाचे लक्ष्य पाच गडी आणि १४६ चेंडूं राखून झटपट गाठले. संघाच्या विजयासाठी सलामीवीर शिखर धवन (३३), शुभमान गिल (३३) आणि संजू सॅमसनची (नाबाद ४३) खेळी महत्त्वपूर्ण ठरली. त्यामुळे भारतीय संघाला झटपट मालिका विजय साकारता आला. याशिवाय फलंदाज दीपक हुडाने विजयात २५ धावांचे याेगदान दिले.

लाेकेश राहुलच्या नेतृत्वात पहिला मालिका विजय
युवा फलंदाज लाेकेश राहुलने आता नेतृत्वातही आपला ठसा उमटवला आहे. त्याने नेतृत्वात दमदार पदार्पण करताना टीम इंडियाला मालिका विजय मिळवून दिला. ताे करिअरमध्ये पहिल्यांदाच भारतीय संघासाठी कर्णधाराची भूमिका बजावत आहे.

वर्ल्डकप : भारतीय संघ १५ सप्टेंबरला जाहीर
यंदा १६ ऑक्टाेबरपासून ऑस्ट्रेलियामध्ये टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात हाेणार आहे. याच स्पर्धेसाठी भारतीय संघ १५ सप्टेंबर राेजी जाहीर हाेऊ शकताे. आता निवड समितीची नजर आशिया कपदरम्यान खेळाडूंच्या कामगिरीवर राहणार आहे.

बातम्या आणखी आहेत...