आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Team India's Third Win Over Lord's; The Indian Team Won By A Resounding 151 Runs; News And Live Updates

दुसरी कसोटी:टीम इंडियाचा तिसऱ्यांदा लॉर्ड‌‌्‌सवर विजय; भारतीय संघाचा 151 धावांनी दणदणीत विजय

लॉर्ड‌्स2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सिराजने घेतल्या एकूण 8 विकेट; लोकेश राहुल ठरला सामनावीर

मो. सिराज (४/३२), बुमराह (३/३३) आणि ईशांतने (२/१३) टीम इंडियाला सोमवारी क्रिकेटची पंढरी लॉर्ड‌्सवर यजमान इंग्लंडविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवून दिला. अजिंक्य रहाणे पाठोपाठ (६१) मो. शमी (५६) व जसप्रीत बुमराहच्या (३४) शानदार खेळीतून भारताने दुसऱ्या कसोटीत यजमान इंग्लंड संघावर १५१ धावांनी विजय संपादन केला. खडतर २७२ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंड संघाचा दुसऱ्या डावात ५१.५ षटकांत १२० धावांत खुर्दा उडाला. लॉर्ड‌्सवरील विजयासह भारतीय संघाने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. आता मालिकेतील तिसऱ्या कसोटीला २५ ऑगस्टला सुरुवात होणार आहे. सलामीची कसोटी अनिर्णीत राहिली होती. भारताकडून दुसऱ्या कसोटीत सिराजने एकूण ८ विकेट घेतल्या. पहिल्या डावात शतक साजरे करणारा लोकेश राहुल सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

भारतीय संघाने कालच्या ६ बाद १८१ धावांवरून पाचव्या दिवशी खेळण्यास सुरुवात केली. यादरम्यान यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत अाणि ईशांत शर्माने धावसंख्येला गती देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, यष्टिरक्षक ऋषभने २२ व ईशांतने १६ धावांची खेळी करून पॅव्हेलियन गाठले. त्यानंतर तळातले गाेलंदाज शमी व बुमराहने संघाच्या धावसंख्येचा अालेख उंचावला. त्यांनी नवव्या विकेटसाठी ८९ धावांची भागीदारी रचली.

कोहली एशियन यशस्वी कर्णधार
विराट कोहलीने आपल्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिका इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामधील मैदानावर भारतीय संघाला पाच वेळा धडाकेबाज विजय मिळवून दिला. यासह कोहली आता यार चारही देशांत सर्वाधिक वेळा विजयश्री खेचून आणणारा आशियाईतील पहिला कर्णधार ठरला.

शमीच्या लॉर्ड‌्सवर सर्वोच्च धावा
सचिन, कोहली, पुजाराला टाकले मागेशमीने लॉर्ड‌्सवर कसोटी अर्धशतक साजरे केले. त्याने दुसरे अर्धशतक नोंद केले. यापूर्वी त्याने २०१४ मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटीत नाबाद ५१ धावा काढल्या होत्या. तो लॉर्ड‌्सवर सचिन, कोहली व पुजारापेक्षा अधिक धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला. त्याने नाबाद ५६ धावांची खेळी केली.

बातम्या आणखी आहेत...