आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराक्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटवरून दिग्गजांमधील मतभेद अद्यापही कायम आहेत. झटपट क्रिकेटच्या टी-20 फॉरमॅटवर माेठ्या संख्येत टीका केली जात आहे. मात्र, अल्पावधीत या छाेट्या फॉरमॅटने जागतिक स्तरावर प्रचंड लाेकप्रियता मिळवली. त्यामुळे मागील पाच वर्षांपासून या फॉरमॅटमध्येच सुपरस्टार हाेण्यासाठी खेळाडूंचा कल वाढला आहे. खेळाडूंच्या याच उत्साहाला जगात आयाेजित करण्यात येत असलेल्या आयपीएल, पीसीएल, बीबीएल, कॅरेबियन लीग आणि बिग बॅशने चालना दिली. यातून 2007 पासून सुरू झालेल्या टी-20 च्या फॉरमॅटने क्रिकेटचा कायापालट करून टाकला. सुरुवातीला मर्यादित षटकांच्या वनडे आणि कसाेटी क्रिकेटला माेठी प्रतिष्ठा हाेती.
गत पाच सत्रांपासून टी-२० सामन्यांत ३५ टक्के वाढ; खेळाडू दबावात गत पाच (२०१७-१८ ते २०२१-२१ दरम्यान) एकूण ९९७ आंतरराष्ट्रीय सामने झाले. यामध्ये जवळपास ४२५ म्हणजेच ४२.४ टक्के हे टी-२० सामने आहेत. तसेच यात ४२३ वनडे सामन्यांचा समावेश आहे. २०१२-१३ ते २०१६-१७ दरम्यान जवळपास ६५० सामने झाले. यात फक्त २३% सामने हे टी-२०चे आहेत. या वाढत्या सामन्यांमुळेच खेळाडू प्रचंड दडपणाखाली येत आहेत. याशिवाय त्यांना शारीरिक आणि मानसिक थकवाही सहन करावा लागत आहे.
महिला क्रिकेटमध्येही टी-२० लाच पसंती
पुरुषांपाठाेपाठ महिला क्रिकेटमध्येही टी-२० फॉरमॅटच्या सामने आयाेजनावर भर दिला जात आहे. यातून गत पाच सत्रांमध्ये महिलांचे एकूण ३०५ सामने झाले. यात २९२ सामने टी-२० चे आहेत. म्हणजेच सर्वाधिक ७० टक्के सामने टी-२०चे आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.