आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Technology Changed With The Game; In 143 Years Came The Foam Roller With The Robot Camera, The Result Was First Shown In 1971

क्रिकेट:खेळाबरोबर तंत्रज्ञान बदलले; 143 वर्षांत रोबोट कॅमेऱ्यासह फोम रोलर आले, 1971 मध्ये पहिल्यांदा निकाल दाखवण्यात आला

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • खेळासोबत सलग तंत्रातदेखील वाढ, इंग्लंड व वेस्ट इंडीज मालिकेतील पहिल्या सामन्यात रोबोटचा वापर झाला

क्रिकेटची सुरुवात १८७७ मध्ये झाली. काळाप्रमाणे तंत्रज्ञानाचा वापर वाढला. सध्या कोरोनामुळे जगातील सर्व खेळांवर परिणाम झाला. इंग्लंड व वेस्ट इंडीजदरम्यान ८ जुलैपासून सुरू झालेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत रोबोट कॅमेऱ्याचा वापर केला. खेळाडूंचा संक्रमणाचा धोका कमी करण्यासाठी पहिल्यांदा रोबोटसमोर नाणेफेक झाली व कर्णधारांची मुलाखत घेतली.

1. पहिली तज्ञ व्यक्ती मैदानात कर्णधारांची मुलाखत घेत होती

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स आणि विंडीजचा कर्णधार जेसन होल्डरकडे आपापले माइक होते. दोघांनी रोबोट कॅमेऱ्यासमोर मुलाखत दिली. पहिला तज्ञ कर्णधारांची मुलाखत घेत होता.

2. १९७९ मध्ये सुपर शॉपर आले, आता प्रत्येक मैदानावर आहे

पावसात क्रिकेट होऊ शकत नाही. अशात मैदान कोरडे करण्यासाठी पहिल्यांदा १९५३ मध्ये फोम रोलर आला. त्यानंतर १९७९ मध्ये पहिल्यांदा सुपर शॉपर वापरले. आता सर्वच मैदानांवर त्याचा वापर.

3. सिडनीच्या रजिस्टर हाऊसमध्ये पहिल्यांदा कसोटीचा निकाल

१९७१ मध्ये सिडनीमध्ये ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांच्यात खेळवण्यात आलेल्या कसोटीला टेस्ट ऑफ सेंच्युरी म्हणतात. येथे राष्ट्रीय कॅश रजिस्टर हाऊसमधील छोट्या टीव्हीवर निकाल दाखवले.

4. न्यूझीलंड व पाक कसोटीत पहिल्यांदा डीआरएसचा वापर

अम्पायरच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी डिसीजन रिव्ह्यू सिस्टिम (डीआरएस) आली. न्यूझीलंड व पाकिस्तान यांच्यातील कसोटीत त्याचा पहिल्यांदा अधिकृत वापर झाला.