आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेव्हिड वॉर्नरने श्रीलंकेविरुद्ध झेलला अफलातून कॅच:हवेत पकडला एका हाताने चेंडू, गोलंदाजही झाला चकीत, व्हिडिओ होतोय व्हायरल

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवारी झालेल्या श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात 35 वर्षीय डेव्हिड वॉर्नरने एका हाताने अप्रतिम झेल घेतला. हे पाहून गोलंदाजी करत असलेल्या एश्टन आगरने आश्चर्यचकित होऊन डोकेच धरले. हा झेल इतका अप्रतिम होता की, फलंदाजीला आलेला धनंजय डी सिल्वाही काही क्षण पाहतच राहिला.

धनंजयला मिड-ऑनवर मोठा शॉट खेळायचा होता आणि त्याने चेंडू सीमारेषेबाहेर पाठवला, पण तो चेंडूला सीमेबाहेर पाठवू शकला नाही. सीमेजवळच मिड-ऑनला उभ्या असलेल्या वॉर्नरने अप्रतिम उडी मारत जवळजवळ अशक्य असलेला झेल टिपला. या कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

फलंदाजीत केली निराशा

या सामन्यात वॉर्नरने अप्रतिम झेल घेतला असला तरी त्याची बॅट चालू शकली नाही आणि तो खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला महेश तिक्षणाने LBW आऊट केले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने ऑस्ट्रेलियासमोर 300 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते.

पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात, डकवर्थ-लुईस नियमानुसार ऑस्ट्रेलियाला 44 षटकात 282 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे ऑस्ट्रेलियाने 9 चेंडूंपूर्वी गाठले आणि पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

झ्ये रिचर्डसनच्या एका ओव्हरमध्ये वानिंदूने लगावले सलग 5 चौकार

या सामन्यात श्रीलंकेचा संघ फलंदाजीला आला तेव्हा वानिंदू हसरंगाने सामन्याच्या 49व्या षटकात झ्ये रिचर्डसनच्या पहिल्या 5 चेंडूत 5 चौकार लगावले आणि षटकात एकूण 22 धावा केल्या. शेवटच्या षटकातही त्याने हेझलवूडला चौकार लगावला. डावाच्या शेवटच्या चेंडूवर तो बाद झाला. हसर्गाने 19 चेंडूंत 6 चौकारांसह 37 धावा केल्या.

बातम्या आणखी आहेत...