आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Brathwaite Hits The Ball To The Batsman, Arguing With The Umpire, The Enraged Umpire Sentenced Him To 5 Runs

ब्रॅथवेटने फलंदाजाला मारला चेंडू:पंचाशीही घातला वाद, संतापलेल्या पंचाने दिली 5 धावांच्या दंडाची शिक्षा, चाहतेही झाले हैरान

8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या टी-20 ब्लास्ट लीगदरम्यान वेस्ट इंडिजच्या कार्लोस ब्रॅथवेटने कोणताही विचार न करता फलंदाजाला चेंडू फेकून मारला. अचानक झालेल्या याप्रकारामुळे मैदानावर वातावरण चांगलचं तापले. या कृत्याबद्दल संतापलेल्या फलंदाजाने पंचांकडे तक्रार केली. ब्राथवेटवर या कृत्यावर पंचही संतापले आणि त्यांनी पेनाल्टी म्हणून 5 धावा दिल्या.

या प्रकारा नंतर कार्लोसने अंपायरकडे जाऊन त्याच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केला, पण अंपायरने त्याचे ऐकले नाही. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

ब्रेथवेट हा बर्मिंगहॅम बिअर्सचा आहे कर्णधार

ब्रॅथवेट हा T20 ब्लास्टमध्ये बर्मिंगहॅम बिअर्स संघाचा कर्णधार आहे. रविवारी डर्बीशायरविरुद्धच्या सामन्यादरम्यान डावाच्या 13व्या षटकात फलंदाज वेन मॅडसेनसोबत ही घटना घडली. त्यानंतर कॅरेबियन अष्टपैलू खेळाडूने मॅडसेनची माफी मागितली. या सामन्यात ब्रॅथवेटने 4 षटकात 29 धावा देत 1 बळी घेतला. यावेळी या सामन्यात त्यांच्या संघाला 7 विकेटने पराभवाला सामोरे जावे लागले.

या सामन्यात ब्रॅथवेटची बॅट चालली नाही

याआधी ब्रॅथवेटला फलंदाजीत फारशी कामगिरी करता आली नव्हती. सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या या खेळाडूने 14 चेंडूंचा सामना केला आणि त्याच्या बॅटमधून केवळ 18 धावा आल्या. डर्बीशायरच्या विजयात ब्रॅथवेटचा चेंडू ज्या फलंदाजाने मारला त्याने महत्त्वाची भूमिका बजावली.

संघाला वेगवान धावा करण्याची गरज असताना ब्रॅथवेटने 14 चेंडूत केवळ 18 धावा केल्या.
संघाला वेगवान धावा करण्याची गरज असताना ब्रॅथवेटने 14 चेंडूत केवळ 18 धावा केल्या.

मॅडसेनने 34 चेंडूत शानदार 55 धावा केल्या. त्याच्या बॅटमधून पाच चौकार आणि तीन शानदार षटकार आले. त्याच्या या शानदार खेळीच्या जोरावर संघाने 18.1 षटकात 160 धावा करत सामना जिंकला

बातम्या आणखी आहेत...