आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टी- 20 लीग:नव्या संघांची अाधारभूत किंमत असेल 1500 काेटी; 2008 च्या तुलनेत 750% अधिक

मुंबई20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • २००८ मध्ये अाधारभूत किंमत २०० काेटी; अाता दाेन नव्या संघांसाठीची निविदा एप्रिलमध्ये
  • २००८ मध्ये मुंबई टीमची बेस प्राइसपेक्षा अधिक किमतीत झाली खरेदी

पुढच्या वर्षीच्या १५ व्या सत्रातील अायपीएलमध्ये दाेन नवीन संघ अापले काैशल्य पणास लावणार अाहेत. त्यामुळे २०२२ मध्ये अायपीएलमधील संघांची संख्या दहा असेल. या दाेन नवीन संघांसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ यंदाच्या एप्रिल महिन्यात निविदा काढणार अाहे. याच टेंडरमध्ये या दाेन्ही संघांची अाधारभूत किंमत (बेस प्राइस) जवळपास १५०० काेटी रुपयांची असेल. ही किंमत २००८ च्या तुलनेत ७५० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे दिसते. यादरम्यान प्रत्येक संघाची बेस प्राइस २०० काेटींची हाेती. मात्र, असे असूनही रिलायन्स ग्रुपने मुंबई इंडियन्सची ४४७ काेटी रुपयांत खरेदी केली हाेती. या संघाला अाधारभूत किमतीपेक्षा २२३ पटीने अधिक भाव मिळाला हाेता. हेच चित्र अाता दिसण्याची शक्यता अाहे.

अाता एकाच संघाला मिळतील ३ हजार काेटी!

२००८ च्या अायपीएल लिलावात अाठ संघांना एकूण २९०० काेटी रुपये मिळाले हाेते. मात्र, अाता एकाच संघाला ३ हजार काेटी मिळण्याची शक्यता अाहे. डेक्कन चार्जर्सला काढल्यानंतर सन टीव्हीने २०१२ मध्ये वर्षाकाठी ८५.०५ काेटींच्या हिशेबाने ५ वर्षांसाठी सनरायझर्स हैदराबादची खरेदी केली.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser