आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी-20 वर्ल्डकप:26 दिवसांत निश्चित, आयाेजनासाठी 28 जूनपर्यंत निर्णय घेण्याची बीसीसीआयला मुदत

मुंबई18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) देशातील काेराेना महामारीचा वाढता धाेका आणि त्यानंतर निर्माण झालेली गंभीर परिस्थिती पाहून टी-२० विश्वचषक आयाेजनाबाबत निर्णय आगामी २६ दिवसांत घ्यावा लागणार आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलने (आयसीसी) मंगळवारी बीसीसीआयला २८ जूनपर्यंतची मुदत दिली आहे. या २६ दिवसांत बीसीसीआयला याबाबतचा ठाेस असा निर्णय जाहीर करावा लागेल.

‘आम्ही देशातील गंभीर परिस्थितीचा अभ्यास करणार आहाेत. त्यानंतर सकारात्मक चित्र पाहूनच आम्ही याबाबत निर्णय घेऊ, अशी प्रतिक्रिया बीसीसीआय अध्यक्ष साैरव गांगुलीने दिली. आयसीसीची दुबईमध्ये व्हर्च्युअल बैठक आयाेजित करण्यात आली. या बैठकीमध्ये बीसीसीआय अध्यक्ष साैरव गांगुली आणि सचिव जय शहा हे दाेेघेही मुंबईतून आॅनलाइन सहभागी झाले हाेते. या बैठकीमध्ये टी-२० विश्वचषक आयाेजनाबाबत सखाेल पद्धतीने चर्चा झाली. यातून काही राज्यांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. यातून या ठिकाणी विश्वचषकाचे सामने आयाेजित करण्यास धाेका निर्माण हाेऊ शकताे. यासाठी आयसीसीने भारतासह या विश्वचषकासाठी पर्यायी म्हणून यूएईची निवड केलेली आहे.

वनडे वर्ल्डकपमध्ये १४, टी-२० मध्ये २० संघ सहभागी : आयसीसीने आता २०२७ व २०३१ वनडे विश्वचषकातील संघ संख्या वाढवली. यातून यात १४ संघ सहभागी हाेतील. टी-२० विश्वचषक २०२४, २०२६, २०२८ व २०३० मध्ये २० संघ खेळणार आहेत. चॅम्पियन्स ट्राॅफी २०२५ व २०२९ मध्ये ८ संघ सहभागी हाेतील.

कुटुंबीयांसह क्रिकेटपटू आज इंग्लंड दौऱ्यावर; बीसीसीआयची परवानगी
मुंबई | इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय पुरुष व महिला क्रिकेट संघाच्या कुटुंबीयांना सोबत घेऊन जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. प्रशिक्षण व सपोर्ट स्टाफचे घरचे सदस्य जाऊ शकतील. इंग्लंड सरकारने त्यांना परवानगी दिली आहे. सर्वजण मुंबईतील एका हॉटेलमध्ये क्वाॅरंटाइन आहेत. आज बुधवारी रवाना होतील. बीसीसीआयने खेळाडूंच्या कुटुंबीयांना सोबत पाठवण्याचे नियोजन केले होते. पुरुष संघ इंग्लंडमध्ये न्यूझीलंड विरुद्ध कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासह ५ कसोटीची मालिका खेळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...