आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेट:देशांतर्गत क्रिकेट मैदानावर सुरू करण्यासाठी बीसीसीआयने घेतले दोन माेठे निर्णय

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 1. राज्यांसाठी १०० पानी एसआेपी; ६० वर्षांवरील काेचची हकालपट्टी
  • 2. वय, रहिवासी बोगस दाखलाप्रकरणी दाेन वर्षांची खेळाडूवर बंदी

काेराेनाचा वाढता धाेका लक्षात घेऊन खेळाडूंच्या बाबतीतही सकारात्मक सूचना तयार केल्या आहेत. यासाठी ारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दाेन महत्त्वाचे निर्णय जाहीर केले. काेविड-१९ च्या संकटकाळात ट्रेनिंगसाठी राज्यांसाठी १०० पानी एसआेपी जाहीर केली. ट्रेनिंग कॅम्पमध्ये सहभागी हाेणाऱ्या सर्वच खेळाडूंना संमतिपत्र सक्तीचे असेल. ६० वर्षांवरील प्रशिक्षकांना प्रशिक्षण देता येणार नाही. त्यांना या काेचिंग प्रक्रियेतून बाद केले जाईल. वय आणि रहिवासी प्रमाणपत्र बाेगस प्रकरणी दाेषी खेळाडूवर २ वर्षांची बंदी घातली जाईल.

वय बाेगस प्रमाणपत्रप्रकरणी कडक कारवाई : गांगुली
आम्ही आता सर्वच वयाेगटांतील खेळाडूंसाठी एक समान कॉम्पिटिशन देण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही बाेगस वयाचे दाखले आणि प्रमाणपत्राच्या बाबतीत ठाेस पावली उचलली. बाेगस प्रमाणपत्र कारवाईचा नियम यंदाच्या सत्रापासून लागू केला जाईल, असे बीसीसीआय अध्यक्ष गांगुलीने सांगितले.

प्रशासनाची मंजुरी गरजेची :
काेराेना परिस्थितीमध्ये स्थानिक राज्य प्रशासनाशी चर्चा करूनच स्टेट असाेसिएशनने क्रिकेटपटूंच्या ट्रेनिंग कॅम्पचे आयाेजन करावे.

बाेगस प्रमाणपत्राचा गुन्हा कबूल केल्यास बंदी टळणार
२०२०-२१ च्या सत्रात वय आणि रहिवासी प्रमाणपत्र बाेगस दिलेल्या खेळाडूवर दाेन वर्षांच्या बंदीची कारवाई केली जाईल. ही बंदीची शिक्षा पूर्ण केलेल्या खेळाडूला मंडळ व राज्य संघटनेच्या काेणत्याही स्पर्धेत सहभागी हाेता येणार नाही. बाेगस प्रमाणपत्रचा गुन्हा कबूल केल्यास खेळाडूला बंदी बाबतीत दिलासा मिळेल.

काेच अरुण लाल, डेव्ह व्हाटमाेर यांच्या काेचिंगला ब्रेक
बीसीसीआयने ६० वर्षांवरील काेचची काेचिंग बंदचा निर्णय घेतला. त्यामुळे बंगाल टीमचे ६५ वर्षीय काेच अरुण लाल आणि बडाेदा टीमचे ६६ वर्षीय डेव्ह व्हाॅटमाेर यांच्या काेचिंगला ब्रेक लागणार आहे. ६० वर्षांवरील सपाेर्ट स्टाफ, काेच, ग्राउंडमनशिवाय मधुमेह, कॅन्सरग्रस्त व्यक्तींना स्टेडियममध्ये प्रवेश नसेल.

एसआेपीमधील महत्त्वाचे मुद्दे; सरावादरम्यान खेळाडूंना चष्मा वापरावा लागेल
- वैद्यकीय पथक हे कॅम्प सुरू हाेण्यापूर्वी खेळाडूंच्या दाेन आठवड्यांतील प्रवास आणि मेडिकल हिस्ट्रीची माहिती घेणार.
- बाधित खेळाडू किंवा स्टाफसाठी पीसीआर टेस्ट सक्तीची असेल. यासाठी तीन दिवसांत दाेन वेळा टेस्ट हाेईल.
- दाेन टेस्टचे रिपाेर्ट निगेटिव्ह आल्यानंतर खेळाडूंना शिबिरात सहभागी केले जाईल.
- खेळाडूंना एन-९५ मास्क घालून स्टेडियममध्ये प्रवेश करावा लागेल {सरावादरम्यान व सार्वजनिक ठिकाणी खेळाडूंना चष्मा घालावा लागेल.
- सरावापूर्वी खेळाडूंसाठी काेराेनासंबंधी प्राेटाेकाॅलची माहिती देणारा वेबिनार
- स्टेडियममध्ये येण्या-जाण्यासाठी खेळाडूंना स्वत:चे वाहन वापरावे लागेल.
- आयसीसीचा लाळेवरील बंदीचा नियम देशांतर्गत स्पर्धेतही कायम असेल.

नाइकीचा भारतीय संघासाेबतचा १४ वर्षे जुना करार संपुष्टात :
भारतीय संघासाेबतचा नाइकीचा जर्सी स्पाॅन्सरचा करार आता पुढच्या महिन्यात संपुष्टात येत आहे. मागील १४ वर्षांपासून नाइकी ही टीमच्या किटसाठी साेबत आहे. या कंपनीने २०१६ मध्ये बीसीसीआयसाेबत करार केला हाेता. नाइकी कंपनी आता हाच करार रिन्यू करण्यासाठी उत्सुक हाेती. मात्र, काेराेनामुळे कंपनीचे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे आता कंपनीने रिन्यूसाठी नकार दर्शवला.

बातम्या आणखी आहेत...