आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी ऋषभ पंत प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. प्रत्येकी वेळी मास्क घालणे शक्य नसल्याचे गांगुली यांनी सांगितले आहे. कारण काही दिवसांपूर्वी भारतीय संघाचा खेळाडू ऋषभ पंत विना मास्क युरो चषकाचा सामना पाहायला गेला होता. त्यानंतर 8 जुलै रोजी त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यावेळी त्याच्यासोबत दयानंद गरानी याचादेखील रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.
दरम्यान, त्यांच्यावर सगळीकडे प्रश्न उपस्थित केले जात होते. परंतु, एवढे दिवस उलटले तरी बीसीसीआयकडून काहीच प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती. परंतु, बीसीसीआयने आज यावर प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येकी वेळी मास्क घालणे शक्य नसल्याचे अध्यक्षांनी सांगितले आहे.
इंग्लंडमध्ये प्रेक्षकांसाठी बनवले नवीन नियम
इंग्लंडमध्ये प्रेक्षकासाठी नियमात मोठे बदलाव केले असल्याचे त्यांनी न्यूज 18 या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. सामना पाहण्यासाठी आता मोठ्या संख्येने प्रेक्षक स्टेडियमवर पोहोचत आहेत. भारतीय संघदेखील 20 दिवस रजेवर होता. त्यामुळे अशा परिस्थितीत सर्वांनी मास्क घालणे शक्य होणार नव्हते.
भारतीय संघ लंडनमध्ये साजरी करत आहे सुट्टी
कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा आपल्या कुटुंबियांसोबत इंग्लंडमध्ये पोहोचले आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप झाल्यापासून भारतीय संघ लंडनमध्ये आपल्या कुटुंबियांसोबत सुट्टी साजरी करत आहे. बीसीसीआय अधिकार्यांच्या माहितीनुसार, हे खेळाडू काही दिवसांपूर्वी गर्दीच्या ठिकाणी पाहायला मिळाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.