आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ बीसीसीआय अधिक श्रीमंत होत आहे. त्याने २०२३ ते २०२७ या कालावधीतील आयपीएलचे माध्यम हक्क विक्रमी ४८ हजार ३९० कोटींना विकले आहेत. या कॅश रिच लीगच्या ४१० सामन्यांचे हक्क इतके महाग विकल्यानंतर बीसीसीआयला पुढील सत्रापासून प्रति चेंडू सुमारे ४९ लाख रुपये म्हणजेच प्रति षटक २.९५ कोटी रुपये मिळतील. २०२३ पासून प्रत्येक आयपीएल सामन्यातून मंडळाला सुमारे ११८ कोटी रुपये मिळतील. भारतीय संघाच्या घरच्या सामन्यापेक्षा ही रक्कम जवळपास दुप्पट (१.९६ पट) आहे.
प्रत्येक फ्रँचायझीची कमाई ५०० कोटींची होणार : आयपीएल मीडिया हक्कात प्रचंड वाढ झाल्याने फ्रँचायझीची कमाई जवळपास दुप्पट म्हणजे किमान ५०० कोटी रुपयांनी वाढणार आहे. उद्योगाच्या अंदाजानुसार २०२२ मध्ये फ्रँचायझीचा माध्यम हक्काचा हिस्सा २०१.६५ कोटी होता. २०२३ मध्ये ४३६.६ कोटी व २०२५ मध्ये ४९५.६ कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.