आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • The Beginning Of Cricket In England Even In The Epidemic; Changes In The Way They Play And Play; The Match Will Not Stop If The Player Is Found Positive

क्रिकेट उद्यापासून मैदानावर:महामारीतही इंग्लंडमध्ये क्रिकेटला सुरुवात; जल्लाेष व खेळण्याच्या पद्धतीत बदल; खेळाडू पाॅझिटिव्ह आढळल्यास नाही थांबणार सामना

लंडनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
जल्लाेष बंद; फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन सक्तीचे
  • 13 मार्चपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट हाेते पूर्णपणे बंद

काेराेनामुळे  चार महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट  बंद हाेते. मात्र, उद्यापासून याच क्रिकेटला सुरुवात हाेणार आहे. यजमान इंग्लंड आणि विंडीज यांच्यातील सलामीच्या कसाेटीला उद्या बुधवारपासून लंडनमध्ये सुरुवात हाेत आहे. १३ मार्चपासून क्रिकेट लाॅक हाेते.  या कसाेटीमुळे क्रिकेट सुरू हाेणार आहे. या दरम्यान  पहिल्यासारखा राेमांच नसेल. प्रेक्षकाला प्रवेश नाही. ही तीन कसाेटीची मालिका बायाे सिक्याेर वातावरणात हाेईल.

जल्लाेष बंद; फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन सक्तीचे

सामन्यादरम्यान विकेट घेतल्यानंतरचा आनंदाेत्सव आता मैदानावर साजरा करतानाही खेळाडूंना मर्यादा पडणार आहे. हाच जल्लाेष करताना खेळाडूंना फिजिकल डिस्टन्सिंगचे काटेकाेरपणे पालन करावे लागेल.

प्रेक्षक नसल्याने स्वाक्षरीचा आग्रह नाही

सामन्यादरम्यान आतापर्यंत प्रेक्षकांचा स्वाक्षरी आणि सेल्फीसाठी आपल्या लाडक्या प्लेयरकडे आग्रह असायचा. मात्र, आता हे काहीही दिसणार नाही.

पंच सुरक्षित किटमध्ये; गाेलंदाज नाही देऊ शकणार आपल्या वस्तू

पंचांनाही स्वेटर, टाेपी आणि चष्मा वापरावा लागणार आहे.ते गाेलंदाजांच्या वस्तू हातात ठेवणार नाहीत.

0