आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

क्रिकेट:बंगाल संघटनेकडून क्रिकेटपटूंना डोळ्यांच्या तपासणीची सक्ती, आजाराची माहिती घेणार

कोलकाता2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बीसीसीआयकडून गत तीन वर्षांपासून प्रत्येक सत्रात डोळ्यांची तपासणी

बंगाल क्रिकेट संघटनेने (कॅब) खेळाडूंना डोळ्यांची तपासणी अनिवार्य केली आहे. कोरोनामुळे दीर्घ काळापासून खेळाडू खेळापासून लांब आहेत. अशात त्यांच्या आय-साइटमध्ये कोणती समस्या तर नाही हे पाहण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. वरिष्ठ व २३ वर्षांखालील खेळाडूंची चाचणी आवश्यक आहे. बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याने म्हटले की, तीन वर्षांपासून आम्ही असे करत आहोत. प्रत्येक सत्रादरम्यान खेळाडूंच्या डोळ्यांची तपासणी केली जाते. त्यांनी कॅबच्या या निर्णयाचे कौतुक केले. कॅबचे अध्यक्ष अविषेक दालमिया म्हणाले की, ‘आय-साइट व रिफ्लेक्स क्रिकेटमध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. 

मुख्य प्रशिक्षक अरुण लालने त्याला अनिवार्य केले आहे. त्यानंतर आम्ही ते केले.’ माजी भारतीय क्रिकेटपटू दीप दास गुप्ताने हा चांगला निर्णय असल्याचे म्हटले. या माजी बंगालच्या कर्णधाराने म्हटले की, ‘क्रिकेट हे हात व डोळ्यांच्या समन्वयाचा खेळ आहे. जेव्हा तुम्ही मैदानावर परततात, तेव्हा डोळ्यांची तपासणी करणे गरजेचे आहे. यात काही चुकीचे नाही. अशात काही समस्या असेल तर तुम्हाला ती कळणार नाही. इमर्जिंग यष्टिरक्षक खेळाडूंचे फिरकी गोलंदाजांसोबत ७ ते १० दिवसांचे शिबिर घ्यावे. त्यामुळे त्यांना ताळमेळ जुळवण्यास मदत होईल.’ जयदीप मुखर्जीने म्हटले की, ‘अशा प्रकारच्या नियमामुळे खेळात मोठे अंतर पाहायला मिळते. 

सामन्यादरम्यान खेळाडू झेल सोडताना आपल्याला दिसतील. कारण ते चेंडूला योग्य प्रकारे समजू शकणार नाहीत. त्यामुळे आम्ही हे पाऊल उचलले.’ त्यासह फिटनेस चाचणी, यष्टिरक्षक व फिरकीपटूंचे शिबिर, संघातील ताळमेळ जुळवण्यास सुरुवात करण्यासाठी बीसीसीआयच्या सूचनांची वाट पाहतोय.’ डालमियाने म्हटले की, आम्ही मंडळाच्या सूचनांची वाट पाहतोय. खेळाडूंची सुरक्षा आमच्यासाठी सर्वात मोठा मुद्दा आहे. त्यासाठी कोणत्याही प्रकारची तडजोड करू शकत नाही. बंगाल संघाचे निवडकर्ते पहिले ३० सदस्यीय संघाची घोषणा करतील. त्यांच्या साेबत सरावाची सुरुवात केली जाईल.

0