आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफॉर्मात असलेल्या मुंबई संघाचे युवा फलंदाज यशस्वी जायस्वाल (१८१) आणि अरमान जाफरने (१२७) शुक्रवारी रणजी ट्रॉफीमध्ये उत्तर प्रदेश संघाविरुद्ध उपांत्य सामन्याच्या दुसऱ्या डावात द्विशतकी भागीदारी केली. याच खेळीतून मुंबई संघाने ४ बाद ४४९ धावांवर आपला दुसरा डाव घाेषित केला. यातून मुंबई संघाला ६६२ धावांची माेठी आघाडी घेता आली. त्यामुळे आता उत्तर प्रदेश संघावर पराभवाचे सावट निर्माण झाले आहे.
मुंबई संघाकडून यशस्वीने आपल्या प्रथम श्रेणी क्रिकेट करिअरमध्ये दुसरे शतक साजरे केले. याशिवाय त्याची ही यामधील आतापर्यंतची सर्वोत्तम खेळी ठरली. यशस्वी व अरमान जाफरने दुसऱ्या विकेटसाठी २८६ धावांची माेठी भागीदारी रचली. या फॉर्मात असलेल्या जोडीला रोखण्यासाठी उत्तर प्रदेश संघाने आठ गाेलंदाजांना संधी दिली.
रजत पाटीदार-आदित्यची शतकी भागिदारी : मध्य प्रदेश संघाकडून युवा फलंदाज रजत पाटीदार ७९) आणि आदित्य श्रीवास्तवने (८२) शानदार शतकी खेळी केली. त्यामुळे संघाला शुक्रवारी बंगालविरुद्ध उपांत्य सामन्याच्या दुसऱ्या डावात २८१ धावा काढता आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.