आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Ipl 2021: All Player Keep In Bio Bubble For One Week Reason Of Corona Pendamic, News And Live Updates

आयपीएल 2021:कोरोना प्रतिबंधामुळे सर्व खेळाडूंना आठवडाभर ‘बायो-बबल’मध्ये ठेवण्यात येणार

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 14 वी आयपीएल 9 एप्रिलपासून सुरु होणार आहे

२०२१ च्या इंडियन प्रीमियर लीगसाठी सोमवारी मुंबईच्या दिल्ली कॅपिटलच्या टीम हॉटेलमध्ये भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन, अष्टपैलू अक्षर पटेल आणि वेस्ट इंडिजचा फलंदाज शिमरॉन हेटमायर एकत्र आले. संघव्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार सर्व खेळाडूंना काेराेना प्रतिबंधामुळे एक अाठवडा स्वतंत्र ठेवण्यात येईल. रविवारी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस वॉक्सही दिल्ली कॅपिटलच्या संघात सहभागी हाेण्यासाठी मुंबईत दाखल झाला. बीसीसीआयच्या आयपीएल २०२० च्या एसओपीनुसार सर्व खेळाडू (भारत-इंग्लंड मालिकेतील खेळाडू वगळता), सहायक कर्मचारी आणि बबलमध्ये प्रवेश करणाऱ्या व्यवस्थापकांना हॉटेलच्या खोल्यांमध्ये सात दिवसांसाठी स्वतंत्र ठेवणे आवश्यक आहे. या कालावधीत प्रत्येक व्यक्तीची काेराेना चाचणी केली जाईल आणि ती निगेटिव्ह अाल्यानंतरच त्यांना त्यांच्या खोलीतून बाहेर येण्याची आणि बाह्य प्रशिक्षण व सराव सत्र सुरू करण्याची परवानगी दिली जाईल.

दिल्ली कॅपिटलचे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगदेखील रविवारी नऊ एप्रिलपासून सुरू हाेणाऱ्या आयपीएलच्या स्पर्धेत संघासमवेत दाखल झाले. रविवारी ट्विटरवर पॉन्टिंग म्हणाले , “सुरक्षित राहून, सर्व नियमांचे पालन करून अाम्ही सराव अाणि नियाेजन करीत अाहाेत.” रविवारी दिल्लीस्थित फ्रँचायझीने संघाचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून माजी भारतीय यष्टिरक्षक अजय रत्रा यांची नियुक्ती करण्याची घोषणा केली. त्यानंतर रत्रा यांनी निवेदनात म्हटले आहे की, “दिल्ली संघाचा सहायक प्रशिक्षक म्हणून रुजू होण्याचा मला अभिमान आहे. काम करण्याची ही एक अतिशय चांगली संधी अाहे. सर्व खेळाडूंचे कौशल्य चांगले आहे. मी संघाला भेटण्यासाठी जास्त वेळ वाट पाहणार नाही. त्वरीत पथकात दाखल हाेणार अाहे. संघासमवेत काम करण्याची चांगली संधी दिल्याबद्दल मी दिल्ली कॅपिटल व्यवस्थापनाचा आभारी आहे. “आयपीएल २०२१ मध्ये दिल्ली कॅपिटलचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) विरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर १० एप्रिलला हाेणार अाहे.

पंतशिवाय संघाची कल्पनाही अशक्य : बेल
इंग्लंडविरुद्ध कसाेटी, टी-२० अाणि एकदिवसीय अशी तिन्ही किकेट प्रकारांची मालिका जिंकणाऱ्या भारतीय संघात ऋषभ पंत नसेल, तर अापण या संघाची कल्पनाही करू शकत नाही, असे मत इंग्लंडचा माजी फलंदाज इयान बेल याने व्यक्त केले अाहे. भारतीय संघात पुनरागमन केल्यानंतर पंतची पदोन्नती चाैथ्या स्थानावर झाली आणि या २३ वर्षीय खेळाडूने निराश केले नाही. दोन एकदिवसीय सामन्यात त्याने अर्धशतके झळकावली. बेल यांनी इएसपीएन क्रिकइन्फोशी बाेलताना सांगितले की, “भविष्यात त्याच्याशिवाय मी आता भारतीय संघाची कल्पना करू शकत नाही. त्याचा भविष्यकाळ अत्यंत उज्ज्वल आहे आणि तो जागतिक स्तरावरील अनेक महत्त्वाच्या खेळाडूंप्रमाणेच सातत्यपूर्ण कामगिरी बजावण्यास सक्षम आहे. “भारत अाणि इंग्लंडदरम्यान आम्ही एक परिपक्व मालिका पाहिली आहे.

त्यातील प्रत्येकाचा खेळ पूर्ण क्षमतेने अाणि व्यावसायिक हाेता. दाेन्ही प्रतिस्पर्धी संघांना असे समतुल्य खेळताना पाहण्याची ही घटना फारच दुर्मिळ आहे. त्यातही चांगली संधी मिळालेला पंत यावर्षी अविश्वसनीय फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यात चांगली व सातत्यपूर्ण खेळी केली. इंग्लंडविरुद्ध कसाेटीत त्याने शतक झळकावत निवड समितीला एकदिवसीय संघात समाविष्ट करण्यास भाग पाडले. रविवारी झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने सात धावांनी विजय मिळविला. या सामन्यात त्याने ६२ चेंडूंत ५ चाैकार व ४ षटकारांसह ७८ धावांची खेळी केली. डावात त्याच्या सर्वाधिक धावा हाेत्या. तो फलंदाजी करताना शांतपणे परंतु वेगवान विचार करताे. गाेलंदाजांच्या चुकीला क्षमा नाही, ही त्याची पद्धत अात्मविश्वासाने परिपूर्ण अाहे.

१४ वी आयपीएल ९ एप्रिलपासून
आयपीएलच्या गतवर्षीच्या हंगामात दिल्ली कॅपिटलला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले हाेते. अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने त्यांचा पराभव केला हाेता. अाता २०२१ ची १४ वी अायपीएल रविवार, ९ एप्रिलपासून सुरू हाेणार अाहे. गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा सामना विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. प्रेक्षकांविना हाेणाऱ्या या सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पाेर्ट‌्सच्या वाहिन्यांवरून केले जाईल. काेणताही संघ यावेळी घरच्या मैदानावर एकही सामना खेळणार नाही. ऋषभ पंत, सॅम बिलिंग्ज अाणि टाॅम कॅरेन हे अायपीएलसाठी साेमवारी मुंबईत दाखल झाले. ते दिल्ली कॅपिटलकडून खेळण्यापूर्वी बायाे-बबलमध्ये वास्तव्यास असतील.

बातम्या आणखी आहेत...