आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रिकेट:कोरोना संकटामुळे कसोटीमध्ये अतिरिक्त खेळाडूला मिळणार आता खेळण्याची संधी

लंडनएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
सरावादरम्यान विंडीजचा ऑलराउंडर रहकिम. - Divya Marathi
सरावादरम्यान विंडीजचा ऑलराउंडर रहकिम.
  • कन्कशनअंतर्गत डोक्यावर दुखापतीने अतिरिक्तला मिळते संधी
  • विंडीजचा इंग्लंड दाैरा, वेतनात 50 % कपात

कोरोनानंतर क्रिकेट पुन्हा सुरू होईल तेव्हा एक अतिरिक्त खेळाडू खेळवण्याची परवानगी मिळू शकते. इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळ (ईसीबी) त्याबाबत आयसीसीशी चर्चा करत आहे. संघाला जुलैमध्ये वेस्ट इंडीज व पाकिस्तान विरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. मात्र, वनडे व टी-२० मध्ये लागू केले जाणार नाही. कन्कशन नियमांतर्गत कोणत्याही खेळाडूच्या डोक्याला दुखापत झाल्यास अतिरिक्त खेळाडू अंतिम ११ खेळवण्याची परवानगी मिळते. ईसीबीचे संचालक स्टी एलवर्दीने म्हटले की, हे प्रकरण आयसीसीकडे असून त्याला परवानगी आवश्यक आहे. आशा आहे, जुलैमध्ये कसोटी मालिकेपूर्वी परवानगी मिळेल. यापूर्वी आयसीसी क्रिकेट समितीने चेेंडू चमकवण्यासाठी लाळेच्या उपयोगावर बंदी घालण्याचा सल्ला दिला. इंग्लंडमध्ये १ जुलैपर्यंत सर्व प्रकारच्या खेळावर बंदी आहे.

क्रिकेट वेस्ट इंडीजने (सीडब्ल्यूआय) इंग्लंड दौऱ्यासाठी परवानगी दिली. संघाला या दौऱ्यात ३ कसोटी खेळायचे आहेत. पहिली कसोटी ८ जुलैपासून साउथम्प्टनमध्ये होईल. ‘ ईसीबीच्या वैद्यकीय समितीसोबत चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतला. दौऱ्यात खेळाडूंना कडक सुरक्षा सुविधा मिळतील. मंडळाला आता कॅरेबियन स्थानिक प्रशासनाकडून खेळाडू व कर्मचाऱ्यांना बोलवण्याची परवानगी घ्यावी लागेल. चाचणी नंतर संपूर्ण टीम चार्टर विमानाने इंग्लंडला जाईल. सीडब्ल्यूआयने खेळाडू, कर्मचारी, अम्पायर व प्रशिक्षक यांच्या वेतनात ५० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला. ही कपात तीन ते सहा महिन्यांसाठी असेल. ती एक जुलैपासून लागू होईल, अशी माहिती सीडब्ल्यूआयचे प्रमुख जॉनी ग्रेव्हने यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...