आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराक्रिकेटच्या मैदानावर १५०+ किमी/प्रतितास वेगाने चेंडू टाकणाऱ्या उमरान मलिक आणि अर्शदीप (१४५+ किमी/प्र.ता.) या युवा वेगवान गोलंदाजांनी आपल्या शानदार कामगिरीच्या बळावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यामुळेच या दोघांना आगामी आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाकडून खेळण्याची संधी देण्यात आली. सध्या भारतामध्ये वेगवान गोलंदाजीची संस्कृती वेगाने रुजत आहे. याचाच प्रत्यय २०१४ मध्ये एेतिहासिक लाॅर्ड्स मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसाेटी सामन्यादरम्यान आला. पाचव्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात भारताला विजयासाठी ६ विकेटची गरज हाेती. ज्याे रुट खेळपट्टीवर हाेता. ईशांत शर्माच्या नेतृत्वात वेगवान गोलंदाजांनी यजमान टीमवर जाेरदार बाउन्सरचा हल्ला चढवला आणि इंग्लंड टीमला धूळ चाखावी लागली. यातून भारतीय संघाने १९८६ नंतर या मैदानावर एेतिहासिक विजयाची नोंद केली हाेती. हाच दबदबा भारतीय वेगवान गोलंदाजांनी आजही ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, विंडीज टीमविरुद्ध सामन्यादरम्यान कायम ठेवला आहे.
२००० ते २०१७ पर्यंत भारताने आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड व ऑस्ट्रेलियामधील ५० पैकी ८ कसाेटी सामन्यांत विजयाची नोंद केली. २०१८ ते २०२२ पर्यंत भारताने नऊ कसाेटी सामने जिंकले आहेत. भारतीय गोलंदाजांनी चॅम्पियनशिपच्या १७ सामन्यांत २२.१५ च्या सरासरीने ३०३ विकेट घेतल्या. भारतीय वेगवान गोलंदाजांना विदेश दौऱ्यावरही वर्चस्व अबाधित ठेवता आले आहे.
गोलंदाजीचे डावपेच : शास्त्रींच्या मते : खेळपट्टी कशीही असाे, २० बळींचे टार्गेट
माजी कर्णधार विराट कोहलीच्या आक्रमक भूमिकेमुळेच भारतीय संघ कसाेटीमध्ये पाच गोलंदाजांसह मैदानावर उतरू लागला. आशिया खंडाच्या बाहेर भारताने गोलंदाजीसाठी खास डावपेच आखले. यातून संघात चार वेगवान गोलंदाज आणि एका फिरकीपटूचा समावेश करण्यास सुरुवात झाली. रवी शास्त्री यांच्या मते, खेळपट्टी ही कशीही असाे. त्यावर २० विकेट घेण्याचे टार्गेट समोर ठेवूनच गोलंदाजांनी खेळावे.
*SENA : विजयी आशियाई संघ
विराट 7
मियांदाद 4
अक्रम 4
धोनी 3
स्पीड महत्त्वाची की लाइन-लेंथ : क्रिकेटतज्ज्ञ
आयपीएलमध्ये दिग्गज क्रिकेटपटू डेल स्टेनने उमरान मलिकवर काैतुकाचा वर्षाव केला. यादरम्यान त्यांनी खास मतही मांडले. ‘लाइन-लेंथची चिंता करू नकोस. स्ट्रेंथवर अधिक लक्ष केंद्रित कर. जितक्या वेगाने चेंडू टाकू शकताेे तितक्या वेगाने गोलंदाजी करण्यावर भर दे,’ असा सल्लाही स्टेनने दिला हाेता. यादरम्यान माजी कॅरेबियन वेगवान गोलंदाज इयान बिशप यांनीही याबाबत आपले िवचार मांडले.
१४५+ चा वेगाने चेंडू टाकणाऱ्यांचा दबदबा कायम
विदेशी खेळपट्टीवरील पाच कसाेटी सामन्यांतील विजयामध्ये वेगवान गोलंदाजांचे मोलाचे याेगदान ठरले. १४५+ किमी/प्रतितास वेगाने चेंडू टाकणाऱ्या बुमराह, शमी, ईशांत, सिराज, उमेशने आपला दबदबा कायम ठेवला. सैनी, नटराजन, आवेश, उमरान, नागरकोटी, शिवम मवीसारखे नवाेदित गोलंदाजही १४५+ च्या वेगाने चेंडू टाकत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.