आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

क्रिकेट:इंग्लंडचे 6 वर्षांत कसोटी मालिकेमध्ये वर्चस्व; 7 विजय, 4 मालिका बरोबरीत

मँचेस्टर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इंग्लंड आणि विंडीज यांच्यातील निर्णायक कसाेटी आजपासून
Advertisement
Advertisement

इंग्लंड व वेस्ट इंडीज यांच्यातील तिसरी व अखेरची कसोटी आज शुक्रवारी सुरू होईल. मालिका सध्या १-१ ने बरोबरीत आहे. या कसोटी बाजी मारणारा संघ मालिका जिंकेल. मात्र, रेकॉर्ड इंग्लंडचा बाजूने आहे. इंग्लिश संघ घराच्या मैदानावर ६ वर्षांपासून एकही मालिका हरला नाही. ७ मध्ये विजय मिळवला आणि ४ मालिका बरोबरीत राहिल्या. ही १२ वी मालिका आहे. विंडीज टीम १९८८ नंतर इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकू शकली नाही. टीमचे या मैदानावर वर्चस्व कायम आहे.

आर्चर अद्याप अडचणीत; विश्रांती मिळण्याचे चित्र

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर सामन्यातूनदेखील बाहेर राहू शकतो. आर्चरला बायाे सुरक्षा तोडल्यामुळे दुसऱ्या कसोटीतून बाहेर करण्यात आले होते. यादरम्यान सोशल मीडियामध्ये लोकांनी त्याच्यावर वर्णभेदी टीका केली होती. आर्चरने म्हटले - ‘मला मानसिकदृष्ट्या १०० टक्के बरे होण्याची गरज आहे, कारण मी या आठवड्यात आपल्या क्रिकेटवर पूर्णपणे लक्ष्य देऊ शकतो.’

Advertisement
0