आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्चरवरील बंदीतून धडा:पाकविरुद्ध मालिकेपूर्वी इंग्लंडचे खेळाडू चार दिवसांसाठी जाणार घरी

लंडन2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 28 जुलैला इंग्लंड व विंडीज मालिका पूर्ण; 5 ऑगस्टपासून पाकविरुद्ध मालिका

इंग्लंडचे खेळाडू पाकिस्तान विरुद्ध मालिकेपूर्वी चार दिवसांसाठी घरी जाऊ शकतील. बायो सुरक्षा व्यवस्थेमुळे पाक मालिकेपर्यंत खेळाडूंना घरी जाण्याची परवानगी नव्हती. मात्र, काही दिवसांपूर्वी वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर पहिली कसोटी संपल्यानंतर घरी गेला होता. त्यानंतर मंडळाने दुसऱ्या कसोटीतून बाहेर करत दंड देखील ठोठावला. त्यासह त्याला पाच दिवसांसाठी आयसोलेशनमध्ये देखील पाठवले. मंडळाकडून खेळाडूंना सांगण्यात आले की, ते केवळ घरी जाऊ शकतील. त्यांना हॉटेल, पब किंवा सार्वजनिक ठिकाणी जाण्यावर बंदी असेल, कारण सुरक्षेतून बाहेर जाऊ शकतील. त्यांना दोन ऑक्टोबर रोजी मँचेस्टरला परत येणे आहे. पाक विरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी ५ ऑगस्टपासून सुरू होत आहे. दुसरीकडे, विंडीज विरुद्ध कसोटी मालिका २८ जुलै रोजी समाप्त होईल. आर्चरची शनिवारी चाचणी घेण्यात आली. मंगळवारी टीम सोबत जोडण्यापूर्वी त्याची दुसरी चाचणी घेतल्या जाईल. स्टोक्सने आर्चरला पाठिंबा देत म्हटले होते की, त्याला एकट्याला सोडायला नका.

ब्रेथवेट, ब्रुक्स, स्टाेस्टन चेसची शानदार अर्धशतकी खेळी; विंडीज संघाचा डाव सावरला!

विंडीज संघानयजमान इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसाेटीच्या पहिल्या डावातील खेळीला रविवारी चाैथ्या दिवशी १ बाद ३२ धावांवरून सुरुवात केली. संघाने ९८ षटकांत ८ बाद २८७ धावा काढल्या. यात ब्रुक्सच्या (६८) अर्धशतकी खेळीचा समावेश अाहे. तसेच राेस्टन चेसने (५१) नाबाद खेळी केली. याशिवाय सलामीवीर ब्रेथवेटने (७५) संघाला सकाळच्या पहिल्या सत्रात दमदार सुरुवात करून दिली. त्यामुळे संघाच्या धावसंख्येला गती मिळाली. हीच लय कायम ठेवताना मधल्या फळीतल्या ब्रुक्सने संयमी खेळी केली. यातून त्याने अर्धशतक ठाेकले. त्यामुळे टीमचा डाव सावरला गेला. त्याची ही खेळी संघाला तारणारी ठरली. सॅम कॅरेनने दाेन व ब्राॅडने तीन बळी घेतले. शनिवारी पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ हाेऊ शकला नाही.

बातम्या आणखी आहेत...