क्रिकेट / चाहत्यांनी रोहितला बनवले टी-20 चा उत्कृष्ट खेळाडू

  • रोहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने सर्वाधिक 4 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली

वृत्तसंस्था

May 21,2020 01:03:00 PM IST

मुंबई. रोहित शर्माला चाहत्यांनी टी-२०चा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड केली. क्रिकइन्फोद्वारे आयोजित सर्वोक्षणात ९४,१८४ मते मिळाली. रोहितला ५९.३३ टक्के आणि आंद्रे रसेलला ४०.६७ टक्के मते मिळाली. यापूर्वी रोहितने जसप्रीत बुमराह, सुनील नरेन, एबी डिव्हिलर्स आणि गेलपेक्षा अधिक मते मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

दुसरीकडे, तज्ञांनी क्रिस गेलला टी-२० क्रिकेटचा सर्वात महान खेळाडू म्हणून निवडले. ३२ खेळाडूंच्या यादीतून तज्ञांनी रोहित शर्माला पहिल्याच फेरीतून बाहेर केले होते. त्यांनी बुमराहला रोहितपेक्षा चांगला टी-२० खेळाडू म्हणून पसंती दिली होती. उपांत्य फेरीत रोहित विरुद्ध गेलला केवळ १३.९६ टक्के मते मिळाली. रोहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने पहिल्यांदा सर्वाधिक ४ वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे.

X