आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • The First Day night Test Match Between India And Sri Lanka, The Last Test Between Hosts India At Home This Season.|Marathi News

कसोटी क्रिकेट:भारत-श्रीलंका संघात पहिल्यांदा डे-नाइट कसोटी, घरच्या मैदानावर यंदाच्या सत्रातील यजमान भारताची शेवटची कसोटी

बंगळुरू7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सलामीच्या विजयाने फाॅर्मात असलेला यजमान भारतीय संघ आता श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका आपल्या नावे करण्यासाठी सज्ज झाला आहे. यासाठी भारतीय संघ आपल्या घरच्या मैदानावर शनिवारपासून श्रीलंकेविरुद्ध दुसरी कसोटी खेळणार आहे. भारत-श्रीलंका हे दाेन्ही संघ मालिकेतील शेवटची व दुसऱ्या कसोटीसाठी बंगळुरूच्या एम.चिन्नास्वामी मैदानावर समोरासमोर असतील. या दाेन्ही संघांतील ही पहिलीच डे-नाइट कसोटी आहे. नवनियुक्त कर्णधार राेहित शर्मा आता आपल्या नव्या नेतृत्वात कसोटी मालिका विजय संपादन करण्यासाठी उत्सुक आहेे. त्यामुळे या कसोटीत भारतीय संघाची नजर सर्वाेत्तम कामगिरीतून विजयाकडे लागली आहे.

पिंक बाॅल कसोटीमध्ये भारत आणि श्रीलंका संघांची रेकाॅर्डमध्ये तुल्यबळ कामगिरी ठरली आहे. भारत आणि श्रीलंका या दाेन्ही संघांनी आतापर्यंत तीन डे-नाइट कसोटी खेळल्या आहेत. यामध्ये दाेन्ही संघांना प्रत्येकी दाेन विजयासह प्रत्येकी एका पराभवाला सामोरे जावे लागले. डे-नाइट कसोटीसाठी भारतीय संघाकडून स्पिन आॅलराउंडर अक्षर पटेलला संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, यासाठी वेगवान गोलंदाज सिराजही शर्यतीत आहे. अपयशी ठरलेल्या जयंत यादवला विश्रांती मिळण्याची शक्यता आहे. अक्षर पटेलने गत पिंक-बाॅल कसोटीत इंग्लंडविरुद्ध अहमदाबादच्या मैदानावर ११ विकेट घेतल्या हाेत्या.

पिच रिपोर्ट
एम. चिन्नास्वामी स्टेडियमवरील खेळपट्टी ही खास करून फिरकी गोलंदाजांसाठी नंदनवन मानली जाते. परंपरेनुसार खेळपट्टी सुरुवातीचे तीन दिवस फलंदाजांसाठी पाेषक मानली जात आहे.
दाेन्ही संघांनी खेळल्या आतापर्यंत प्रत्येकी ३ डे-नाइट कसोटी

बातम्या आणखी आहेत...