आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराT-20 विश्वचषक 2022 मध्ये भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आपल्या बॅटने धुमाकूळ घालत आहे. यादरम्यान त्याने आणखी एक सन्मान पटकावला आहे. T-20 क्रिकेटमधील कामगिरीबद्दल कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) प्लेअर ऑफ द मंथ पुरस्काराने सन्मानित केले आहे.
कोहलीसोबतच झिम्बाब्वे संघाचा सिकंदर रझा आणि दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलर यांनाही पुरुष गटात या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. पण हा पुरस्कार कोहलीच्या खात्यात आला आहे. कोहलीला हा पुरस्कार पहिल्यांदाच मिळाला आहे. गेल्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याला हा सन्मान मिळाला आहे.
कोहलीची विश्वचषकात शानदार कामगिरी
34 वर्षीय विराट कोहली जवळपास तीन वर्षांपासून खराब फॉर्मशी झुंज देत होता. मात्र, त्याने तीन महिन्यांतच आपली लय साधली आहे. या T-20 विश्वचषकात कोहलीने आतापर्यंत सर्वाधिक 246 धावा केल्या आहेत.
यादरम्यान त्याने 3 अर्धशतके झळकावली आहेत. कोहलीने या विश्वचषकात पाकिस्तान (नाबाद 82), नेदरलँड्स (नाबाद 62) आणि बांगलादेश (नाबाद 64) विरुद्ध तिन्ही अर्धशतके झळकावली आहेत.
पाकिस्तानच्या निदाला महिला गटात पुरस्कार
आयसीसीने सोमवारी (7 नोव्हेंबर) ऑक्टोबरसाठी पुरुष आणि महिला गटातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जाहीर केला. पुरुषांमध्ये कोहलीने हा किताब पटकावला, तर महिलांमध्ये पाकिस्तानच्या निदा दारला हा पुरस्कार मिळाला आहे. कोहलीने ऑक्टोबर महिन्यात 4 टी-20 सामने खेळले. यादरम्यान दोन अर्धशतके झळकली. यामध्ये तिने पाकिस्तानकडून कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी साकारली.
यापूर्वी कोहलीने पटकावले हे पुरस्कार
विराट कोहलीचा हा पहिला आयसीसी पुरस्कार नाही. याआधीही त्याने ICC क्रिकेटर ऑफ द इयर, क्रिकेटर ऑफ द डिकेड, ODI क्रिकेटर ऑफ द डिकेड, ODI प्लेयर ऑफ द इयर, टेस्ट प्लेयर ऑफ द इयर असे अनेक पुरस्कार जिंकले आहेत. यापैकी काही पुरस्कार कोहलीने अनेक वेळा जिंकले आहेत.
एका वर्षात सर्व आयसीसी वार्षिक वैयक्तिक पुरस्कार जिंकणारा कोहली हा एकमेव क्रिकेटपटू आहे. 2018 मधील त्याच्या प्रभावी कामगिरीनंतर, कोहलीला सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी, ICC कसोटी आणि ODI प्लेअर ऑफ द इयरने सन्मानित करण्यात आले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.