आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

क्रिकेट:30 जुलैपासून पहिली वर्ल्डकप सुपर लीग; 13 संघांचे 156 सामने, आठ संघ वर्ल्डकपसाठी पात्र

दुबई/मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
लीगच्या दरम्यान गाेलंदाजांचा पायाचा नाे बाॅलचा निर्णय आता मैदान पंचएेवजी थर्ड अंपायर देणार.
  • इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यातील मालिकेने लीगची सुरुवात; तीन वनडेची मालिका

जागतिक स्तरावर वनडे क्रिकेटला वेगाने चालना मिळावी यासाठी आयसीसीने नवा प्रयाेग साकारण्याचा निर्णय घेतला. यातून येत्या ३० जुलैपासून सुरुवात हाेईल. पहिल्या वर्ल्डकप सुपर लीगची ही सुरुवात वनडे मालिकेने हाेणार आहे. गुरुवारपासून इंग्लंड व आयर्लंड यांच्यातील वनडे मालिकेला सुरुवात हाेईल. ही वर्ल्डकप सुपर लीगची सलामीची मालिका आहे. या संघांत तीन वनडेची मालिका रंगणार आहे. भारतीय संघ सुपर लीगची आपली पहिली मालिका पुढच्या वर्षी आॅस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. भारताचा डिसेंबरमध्ये आॅस्ट्रेलिया दाैरा आहे.

वर्ल्डकपच्या वेळापत्रकात केला बदल; रद्द झालेले सामने पुन्हा आयाेजित करण्यावर अधिक भर : आयसीसी
आयसीसीचे जीएम आॅपरेशन ज्याेफ अलार्डिस यांनी तीन वर्षांपर्यंत रंगणाऱ्या वनडे सुपर लीगचे वेळापत्रक जाहीर केले. यात खासकरून रद्द झालेल्या सामन्यांच्या आयाेजनावर भर देताना वेळापत्रकामध्ये बदल केला. काेविड-१९ च्या संकटामुळे अनेक सामने रद्द झाले आहेत. ते आता पुन्हा आयाेजित केले जातील, असेही त्यांनी सांगितले. याचाही आता या संघांना चांगला फायदा हाेईल.

वनडे लीगमध्येही भारत-पाक सामना नाही हाेणार
आयसीसीने गतवर्षी कसाेटी चॅम्पियनशिपसाठीचे वेळापत्रक जाहीर केले. यामध्ये पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कसाेटी मालिका आयाेजित करणे आयसीसीने टाळले आहे. त्यामुळे हे दाेन्ही संघ कसाेटी मालिकेत समाेरासमाेर नसतील. हीच खबरदारी आता वनडेच्या सुपर लीगदरम्यानही घेण्यात आली.

तीन वनडेच्या आठ मालिका हाेणार
सर्व १३ संघांना तीन वनडेच्या एकूण ८ मालिका खेळाव्या लागतील. यात चार मालिका घरच्या मैदानावर व उर्वरित चार मालिका दाैऱ्यात हाेतील. इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यात ३० जुलैला सलामीचा वनडे हाेईल. त्यापाठाेपाठ १ आॅगस्ट आणि ४ आॅगस्टला अनुक्रमे दुसरा व तिसरा वनडे सामना आयाेजित करण्यात आला. भारतीय संघ पुढच्या वर्षी आॅस्ट्रेलियाचा दाैरा करणार आहे.

लीगमध्ये प्रत्येक विजयासह संघांना १० गुणांची कमाई करता येईल. तसेच सामना टाय, अनिर्णीत आणि रद्द झाल्यास दाेन्ही संघांना प्रत्येकी पाच गुण मिळतील. या लीगच्या माध्यमातून प्रत्येक संघ एकूण २४ वनडे सामने खेळणार आहे. यातून प्रत्येक संघाला २४० गुणांची कमाई करता येईल.तसेच प्रत्येक संघाला सामन्यादरम्यान दाेन रिव्ह्यु मिळतील.