आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • The Host Team Has Never Won A T20 World Cup; England Are In The Semi finals From Group A | Marathi News

टी-20 वर्ल्डकप:यजमान संघाने कधीही जिंकला नाही टी-20 वर्ल्डकप ; इंग्लंड संघ अ गटातून उपांत्य फेरीत

सिडनीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मार्क वूड (३/२६), हेल्स (४७) आणि बेन स्टाेक्सने (४२) सर्वाेत्तम खेळीतून इंग्लंड संघाला शनिवारी टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीचे तिकीट मिळवून दिले. बटलरच्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघाने अ गटातील आपल्या शेवटच्या सामन्यात आशिया कप विजेत्या श्रीलंका संघाला पराभूत केले. इंग्लंड संघाने १९.४ षटकांमध्ये ४ गड्यांनी सामना जिंकला. शनाकाच्या नेतृत्वाखाली श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १४१ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात इंग्लंड संघाने ६ गड्यांच्या माेबदल्यात विजयश्री खेचून आणली. करा वा मरा असलेला सामना इंग्लंडने जिंकून स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले.

यासह न्यूझीलंडपाठाेपाठ आता इंग्लंड संघ अ गटातून उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. पराभवाने श्रीलंकेपाठाेपाठ गत चॅम्पियन आणि यजमान ऑस्ट्रेलियाच्या संघालाही पॅकअप करावे लागले. श्रीलंकेच्या पराभवामुळे ऑस्ट्रेलिया संघाच्या उपांत्य फेरीतील प्रवेशाच्या आशा धुळीस मिळाल्या. यासह आतापर्यंत यजमान संघांना आपल्या घरच्या मैदानावर कधीही टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम गाजवता आला नाही.

बेन स्टाेक्सने सावरला डाव; इंग्लंड संघाला सेमीफायनलचे तिकीट नाणेफेक जिंकून श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर पथूम निसंका (६७) आणि कुशल मेंडिसने (१८) संघाला दमदार सुरुवात करून देताना २४ चेंडूंत ३९ धावांच्या भागीदारीची सलामी दिली. मात्र, यादरम्यान वाेक्सने लगेच मेंडिसला बाद केले. त्यानंतर श्रीलंका संघाची दाणादाण उडण्यास सुरुवात झाली. यादरम्यान निसंकाने एकाकी झंुज देत अर्धशतक झळकावले. मात्र, इतर फलंदाज फार काळ मैदानावर आव्हान कायम ठेवू शकले नाहीत. यादरम्यान भानुका राजपक्षेने २२ धावांची खेळी केली. इंग्लंडकडून मार्क वूडने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. त्यानंतर बेन स्टाेक्सने अष्टपैलू खेळीतून इंग्लंडचा डाव सावरला. त्याने एक बळी घेत फलंदाजी करताना ४२ धावांची खेळी केली. सलामीवीर व कर्णधार जाेस बटलरने सहकारी अॅलेक्ससाेबत अर्धशतकी भागीदारीची सलामी दिली. त्यानंतर बटलर बाद झाल्यावर बेन स्टाेक्सने एकट्याने झंुज देत नाबाद खेळीतून संघाला सेमीफायनलचे तिकीट मिळवून दिले. त्याने ३६ चेंडूंमध्ये २ चाैकारांसह नाबाद ४२ धावांची खेळी केली.

बातम्या आणखी आहेत...