आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटीम इंडिया सध्या दाैऱ्यावर यजमान बांगलादेश संघाविरुद्धच्या कसाेटी मालिका विजयासाठी उत्सुक आहे. भारताने दमदार विजयी सलामी देत दाेन कसाेटी सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. येत्या गुरुवारपासून भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या निर्णायक कसाेटीला सुरुवात हाेत आहे. भारतीय संघाचे चार फलंदाज या दाैऱ्यावर चमकले. त्यांनी शतकवीराचा बहुमान पटकावला. यादरम्यान ईशान किशनने पहिले आंतरराष्ट्रीय आणि शुभमान गिलने कसाेटीत पहिले शतक साजरे केले. तसेच विराट काेहलीने ७२ वे शतक साजरे करताना रिकी पाँटिंगच्या विक्रमाला मागे टाकले. गत आकडेवारीवर खास फाेकस टाकल्यास भारतीय संघाचे फलंदाज जागतिक स्तरावर पिछाडीवर पडलेले आहेत. वर्ष २०२२ मध्ये भारतीय संघाच्या फलंदाजांनी ७० सामन्यांदरम्यान फक्त १५ शतके साजरे केलीत. याच तुलनेत इंग्लंड संघाने ५४ सामन्यांत २७ शतके, न्यूझीलंडने ४७ सामन्यांमध्ये १९ शतके, पाकिस्तानने ४३ सामन्यांत १८ शतके आणि ऑस्ट्रेलियाने ४८ सामन्यांत १७ शतकांची नाेंद केली. यंदाच्या सत्रात एकूण १५ पैकी सात शतके ही सप्टेंबर महिन्यात साजरी झाली. यादरम्यान विराट काेहलीने अफगाणिस्तानविरुद्ध आशिया कपमध्ये टी-२० मध्ये शतक झळकावले. यासह ताे तीन वर्षांनंतर शतकवीराचा मानकरी ठरला. तेव्हापासून आजतागायत भारताच्या सातपैकी दाेन शतकांची कमाई काेहलीने केली. म्हणजेच फाॅर्मात असलेल्या विराट काेहलीने भारतीय संघाच्या शतकातही माेठे याेगदान दिले. गत तीन वर्षांतील आकडेवारीतून हे सिद्ध हाेते. वर्ष २०१६ पासून २०१९ पर्यंतचा काळ हा विराट काेहलीचा पीक पीरियड मानला जाताे. यादरम्यान त्याने ७१ च्या सरासरीने धावा काढल्या.
सप्टेंबरपर्यंत भारतीय संघ हाेता पिछाडीवर
विराट काेहलीच्या पीक पीरियडदरम्यान जगातील सर्वाधिक शतके साजरे करणारा भारतीय संघ अधिक पिछाडीवर पडला हाेता. यादरम्यान भारतीय संघ पाचव्या स्थानावर हाेता. त्यामुळे इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडने आघाडी घेतली हाेती. सप्टेंबर महिन्यापर्यंत भारतीय संघ या कामगिरीत श्रीलंका आणि बांगलादेश टीमच्याही मागे हाेता. आशिया कपमध्ये काेहलीच्या शतकाने भारतीय संघाला माेठी झेप घेता आली. भारतीय संघाने २०४ सामन्यांत सर्वाधिक १२७ शतके साजरी केलीत.
गत २ वर्ष; भारतीय कर्णधारांचे शतक हाेईना
भारतीय संघाने गत दाेन वर्षांत आंतरराष्ट्रीय सामन्यांदरम्यान आठ वेळा नेतृत्वात खांदेपालट केला. यातून भारताचे आठही फलंदाज यादरम्यान सपशेल अपयशी ठरले. त्यांना या कर्णधाराच्या भूमिकेत शतकाचा पल्ला गाठता आला नाही. भारताकडून रहाणेने कर्णधाराच्या भूमिकेत शेवटचे शतक २६ डिसेंबर २०२० रोजी मेलबर्न कसाेटीत साजरे केले हाेते. त्यानंतर अद्याप भारतीय संघाच्या कर्णधाराला शतकवीराचा बहुमान मिळाला नाही.
2016-19: फक्त टीम इंडियाचे 100+ शतके
संघ सामने शतक
भारत 204 127
ऑस्ट्रेलिया 168 90
इंग्लंड 172 86
न्यूझीलंड 148 63
द. आफ्रिका 144 63
जानेवारी २०२० नंतर भारतीय संघाची घसरण
संघ सामने शतक
इंग्लंड 125 48
पाकिस्तान 106 37
ऑस्ट्रेलिया 103 32
न्यूझीलंड 98 31
भारत 130 28
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.