आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • T20 | The. India's Second Series Draw At Home Against Africa, Rain Cancels Fifth T20; Water On The Series Win

भारत विरुध्‍द द. आफ्रिका:द. आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर भारताची दुसरी मालिका बराेबरीत, पावसाने पाचवा टी-20 रद्द

बंगळुरू9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यजमान टीम इंडिया आणि पाहुण्या दक्षिण आफ्रिका या दाेन्ही संघांच्या मालिका विजयाच्या आशेवर पाणी फेरले गेले. या दाेन्ही संघांना रविवारी पावसाचा फटका बसला. पावसाच्या व्यत्ययाने मालिकेतील पाचवा टी-२० सामना रद्द करण्यात आला. त्यामुळे भारत व आफ्रिका यांच्यातील ५ टी-२० सामन्यांची मालिका २-२ ने बराेबरीत राहिली. आफ्रिकेविरुद्ध भारताची सलग दुसरी मालिका घरच्या मैदानावर बराेबरीत राहिली. यापूर्वी सप्टेंबर २०१९ मध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका १-१ ने बराेबरीत राहिली हाेती.

पावसाच्या व्यत्ययाने सामन्याला ५० मिनिटे उशिराने सुरुवात झाली हाेती. यादरम्यान सामना प्रत्येकी १९ षटकांचा करण्यात आला. भारताचा कर्णधार ऋषभ सलग पाचव्या सामन्याच्या नाणेफेकीत अपयशी ठरला. प्रथम फलंदाजी भारताने ३.३ षटकांत २ बाद २८ धावा काढल्या हाेत्या. एकूण सहा बळी घेणारा भुवनेश्वर मालिकावीर ठरला.

100 वा टी २० आहे डेव्हिड मिलरचा. या फाॅरमॅटचा शतकी सामना खेळणारा मिलर हा टीमचा १२ वा खेळाडू ठरला आहे. 1 पहिला कर्णधार ठरला ऋषभ पंत,ज्याने नेतृत्व करताना मालिकेतील सुरुवातीच्या पाचही सामन्यांत नाणेफेक गमावली.

गंभीर दुखापतीमुळे कर्णधार तेंबा बावुमा बाहेर; केशव महाराजकडे नेतृत्व
दक्षिण आफ्रिकेचा नियमित कर्णधार तेंबा बावुमा गंभीर दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर झाला. त्यामुळे त्याला पाचव्या सामन्यात सहभागी हाेता आले नाही. त्याच्या जागी संघाच्या नेतृत्वाची धुरा केशव महाराजकडे साेपवण्यात आली. यादरम्यान पाचव्या सामन्यासाठी आफ्रिका संघात तीन महत्त्वाचे बदल करण्यात आले. बावुमाच्या जागी हेन्ड्रिक्स, शम्सीच्या जागी एनगिडी आणि जान्सेनच्या जागी ट्रिस्टियन स्टब्सला संधी देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...