आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आफ्रो-आशिया कप:भारत-पाक खेळाडू आता एकाच संघाकडून खेळणार, पुढच्या वर्षी आफ्रो-आशिया कप स्पर्धेचे आयोजन

दुबई9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये द्विपक्षीय मालिकेचे आयोजन केले जात नाही. मात्र, आता याच दाेन्ही संघांचे खेळाडू एकाच संघाकडून मैदानावर साेबत खेळताना दिसणार आहेत. पुढच्या वर्षी आफ्रो-आशिया कप स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. जून-जुलैमध्ये होणाऱ्या या टी-२० फॉरमॅटच्या स्पर्धेदरम्यान आशिया संघात भारत, पाक, बांगलादेश, श्रीलंका संघाचे खेळाडू सहभागी होणार आहेत. यापूर्वीही या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

यादरम्यान साैरव गांगुली, राहुल द्रविड, अख्तर आणि आफ्रिदी हे साेबत खेळले होते. तसेच २००५ आणि २००७ मध्ये धाेनी, माे. युसूफही साेबत खेळताना दिसले. आफ्रिका संघामध्ये दक्षिण आफ्रिकेसह केनिया, झिम्बाव्वे टीमच्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...