आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • The NCA Director Rahul Dravid Has His Experience Of Playing Cricket In The Under 19 And 'A' Teams; News And Live Updates

दिव्य मराठी विशेष:800 धावा करूनही संघात घेतले जात नाही तेव्हा वाईट वाटतेच, त्यामुळे माझ्यासोबत जाणाऱ्यांना सामने खेळायला मिळावेत हे ठरवले होते : द्रविड

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एनसीए संचालकांनी अंडर 19 आणि ‘अ’ संघात क्रिकेट खेळण्याचे आपले अनुभव केले शेअर

राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (एनसीए) संचालक व भारतीय संघाचे माजी दिग्गज फलंदाज राहुल द्रविड यांनी म्हटले आहे की, ‘मी भारताच्या अंडर-19 आणि ‘अ’ श्रेणीच्या संघांचा प्रशिक्षक होतो तेव्हा दौऱ्यावरील प्रत्येक खेळाडूला सामना खेळण्याची संधी मिळावी हे सुनिश्चित केले होते. आमच्या काळात तसे होत नव्हते. त्यामुळे नवोदितांना खेळण्याची संधी मिळावी, अशी व्यवस्था मी तयार केली.’ द्रविड श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या भारताच्या संघाचे प्रशिक्षक असतील. या संघाचे नेतृत्व शिखर धवनकडे आहे. द्रविड यांनी ‘अ’ संघासोबतचे अनुभव शेअर केले, ते त्यांच्याच शब्दांत...

फिटनेसबाबत ऑस्ट्रेलिया- अाफ्रिकेचे खेळाडू हे आमचे आदर्श होते, आम्हाला सांगायचे- जास्त जिम करू नका, शरीर कडक होईल
‘मी जेव्हा जेव्हा ‘अ’ टीमसह दौऱ्यावर जात होतो, तेव्हा खेळाडूंना आधीच सांगत होतो की, तुम्ही माझ्यासोबत आला आहात, त्यामुळे तुम्ही येथून सामना न खेळता जाणार नाही. मी जेव्हा कनिष्ठ स्तरावर खेळत होतो तेव्हा माझे काही अनुभव होते. ‘अ’ संघाच्या दौऱ्यावर जाणे आणि सामना खेळण्याची संधी न मिळणे खूप वाईट होते.नवोदित क्रिकेटपटूंना असे निराशाजनक अनुभव मिळावेत, असे मला कधीही वाटत नव्हते. तुम्ही कठोर मेहनत करून चांगली कामगिरी करता.

तुम्ही ७००-८०० धावा करता. पण जेव्हा तुम्ही संघासोबत जाता तेव्हा तुम्हाला तुमची योग्यता दाखवण्याची संधीच मिळत नाही. त्यानंतर तुम्हाला निवडकर्त्यांचे लक्ष वेधण्यासाठी पुढील सत्रात पुन्हा ८०० धावा करा‌व्या लागतात. ते सोपे नाही आणि पुन्हा संधी मिळेल याची कुठलीही हमी नाही. त्यामुळे तुम्हाला सुरुवातीलाच खेळाडूंना सांगावे लागते की, हे स‌र्वश्रेष्ठ १५ खेळाडू आहेत आणि आम्ही यांच्यासह खेळू, भलेही ते सर्वश्रेष्ठ एकादश नसले तरी. अंडर-19 स्तरावर आपण सामन्यांमध्ये पाच-सहा बदल करू शकतो. आजच्या काळात खेळाडूंना फिटनेसचे चांगले ज्ञान आहे. भारतीय क्रिकेटपटूंना आता जगात सर्वात फिट मानले जाते. पण १९९०-२००० च्या दशकात असे नव्हते. मी देशात जिथे कुठे जात होतो, तिथे अनेक जण क्रिकेटच्या वेडाबाबत बोलत असत.

किती मोठ्या संख्येने लोक गल्ल्यांमध्ये, समुद्रकिनाऱ्यांवर क्रिकेट खेळत असतात, हे उत्साहाने सांगत असत. पण त्यामुळे तुम्ही क्रिकेट खेळाडू होत नाही. फक्त खेळावर प्रेम असणारेच खेळाडू होऊ शकतात. आमच्याकडे असेच लोक होते. मॅटिंग विकेट किंवा टर्फ विकेट नाही. अपूर्ण प्रशिक्षण, फिटनेससाठी कामचलाऊ मदत अशी त्या दशकातील एकूणच सर्व परिस्थिती. आम्हाला ज्ञानाची अत्यंत गरज होती. पण वंचितच राहावे लागत होते. तेव्हा तंत्रज्ञानही आधुनिक नव्हते. क्रिकेटचा मजबूत पाया नव्हता. फिटनेसच्या बाबतीत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडू आणि फिटनेस प्रशिक्षक हे आमचे आदर्श होते. आम्हाला सांगितले जात होते की, जास्त जिम करू नका, शरीर कडक होईल.’- राहुल द्रविड

बातम्या आणखी आहेत...