आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढाक्यामध्ये सलामी सामना:भारत-यजमान बांगलादेश संघात आजपासून वनडे मालिका रंगणार

ढाका2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यजमान न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिका पराभवातून सावरलेला भारतीय संघ आता दाैऱ्यावर दमदार विजयी सलामीसाठी सज्ज झाला आहे. भारत आणि यजमान बांगलादेश यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेला रविवारपासून सुरुवात हाेत आहे. ढाका येथील सलामीच्या वनडे सामन्यात हे दाेन्ही संघ आज समाेरासमाेर असतील. याच मालिकेच्या माध्यमातून टीम इंडिया पुढच्या वर्षी आपल्या घरच्या मैदानावर हाेणाऱ्या वनडे विश्वचषकाच्या माेहिमेला सुरुवात करणार आहे. भारताला सलामीच्या सामन्यापूर्वी माेठा धक्का बसला. टीमचा गाेलंदाज शमी दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी संघामध्ये उमरान मलिकला संधी देण्यात आली. दास हा घरच्या मैदानावरील मालिकेदरम्यान टीमचे नेतृत्व करणार आहे. नियमित कर्णधार तमीम सरावादरम्यान जायबंदी झाला. त्यामुळेच लिटनकडे नेतृत्व साेपवण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...