आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • The Official Announcement Of The Postponement Of The World Cup On Friday, The ICC Meeting On July 10

टी-20 विश्वचषक:विश्वचषकाच्या स्थगितीची शुक्रवारी अधिकृत घाेषणा, येत्या 10 जुलैला आयसीसीची बैठक; निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

सिडनी/दुबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आयसीसीच्या निर्णयानंतर बीसीसीआयचा यंंदाच्या सत्रातील आयपीएल आयाेजनाचा मार्ग होईल सुकर
Advertisement
Advertisement

काेराेनाच्या संकटामुळे सध्या आॅस्ट्रेलियातील टी-२० विश्वचषकाच्या आयाेेजनाबाबत तर्कवितर्क साधल्या जात आहे. टांगती तलवार असलेल्या या स्पर्धेच्या आयाेजनाची चर्चां चांगलीच रंगत आहे. मात्र, आता या चर्चेवर पडदा पडणार आहे. येत्या शुक्रवारी आयसीसीची बैठक हाेणार आहे. या बैठकीमध्ये विश्वचषकाचे आयाेजन स्थगित करण्याची अधिकृत अशी घाेषणा केली जाईल, अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली. त्यामुळे आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) यंंदाच्या सत्रातील आयपीएल आयाेजनाचा मार्ग सुकर हाेणार आहे. 

ऑस्ट्रेलियामध्ये ऑक्टाेबर-नाेव्हेंबरदरम्यान टी-२० विश्वचषकाचे आयाेजन करण्यात येईल. मात्र, अद्याप काेराेनाचे संकट कायम आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या आयाेजनावर टांगती तलवार आहे.  आता याच आयाेजनाबाबत आयसीसीची बैठक हाेईल. या बैठकीमध्ये स्पर्धेच्या स्थगितीबाबतचा निर्णय घेतला जाईल. 

Advertisement
0