आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी-20 विश्वचषक:विश्वचषकापर्यंत संथ होणार खेळपट्टी, 5 फिरकीपटूंना स्थान; स्पर्धेसाठी 15 सदस्यीय भारतीय संघ घोषित, धोनी बनला मेंटॉर

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्पर्धेपूर्वी यूएईमध्ये आयपीएलचे 31 सामने होणार आहेत

टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर झाला. संघात ५ फिरकीपटूंचा समावेश करण्यात आला. आयपीएलही यूएईमध्ये होत आहे. त्यामुळे विश्वचषकापर्यंत खेळपट्टी संथ होईल, अशी अपेक्षा आहे. २०१७ मध्ये मर्यादित षटकांचा अखेरचा क्रिकेट सामना खेळणाऱ्या ऑफ स्पिनर आर. अश्विनचे पुनरागमन झाले. या निर्णयाने सर्वांना अाश्चर्यचकित केले. सर्वांनी एकदिवसीय टी-२० मधील त्याचे करिअर समाप्त झाल्याचे मानले होते. मात्र, वॉशिंग्टन सुंदरच्या दुखापतीने त्याचा मार्ग उघडला. दुसरीकडे, युजवेंद चहलला बाहेर करणे अाश्चर्यकारक ठरले.

कुलदीपदेखील संघाचा सदस्य नाही. २०१७ पासून ‘कुल-चा’ जाेडीने भारताला अनेक सामने जिंकून दिले. २०१७ चॅम्पियन ट्रॉफीमध्ये पराभवानंतर अश्विन व जडेजाला बाहेर करत ते दोघे संघाचे प्रमुख फिरकीपटू बनले होते. मात्र, आता अश्विन-जडेजा जोडीने पुनरागमन केले. चहलच्या जागी राहुल चाहरचा लेग स्पिनर म्हणून समावेश केला. चाहर महत्त्वाच्या वेळी बळी घेतो. अक्षर पटेलचा खेळ जडेजाप्रमाणे आहे, त्याचीदेखील निवड झाली. तामिळनाडूचा मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीला आयपीएलमधील कामगिरीचे बक्षीस मिळाले.

२०१९ नंतर कोहली व धोनीची रि-युनियन
विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ अद्याप एकही मोठा किताब जिंकू शकला नाही. त्याच्या मदतीसाठी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला संघाचा मेंटाॅर बनवण्यात आले. दोन्ही खेळाडू २०१९ विश्वचषकानंतर पुन्हा एकदा सोबत काम करतील. धोनी आयपीएल २०२१ च्या उर्वरित

आयपीएल २०२१ चा ऑरेंज कॅप मिळवणारा धवन संघात नाही
श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघाचे नेतृत्व करणारा शिखर धवन संघात नाही. सध्या त्याच्याकडे आयपीएल २०२१ ची ऑरेंज कॅप आहे. २०१९ पासून सलग संघाचा सदस्य असलेल्या श्रेयस अय्यरला राखीव म्हणून स्थान मिळाले. जखमी असतानाही ईशान किशन व सूर्यकुमार यादवने सलग धावा करत संघात प्रवेश केला.

मुंबई इंडियन्सचे ६, राजस्थानच्या एकही खेळाडूला संधी नाही
आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्सच्या सर्वाधिक ६ खेळाडूंना संघात स्थान मिळाले. उपविजेत्या दिल्लीचे ३ खेळाडू आणि पंजाबचे २, बंगळुरू, कोलकाता, हैदराबादचे प्रत्येकी १-१ खेळाडू आहेत. आयपीएल २००८ चा विजेता राजस्थान संघातील एकाही खेळाडूला संधी मिळाली नाही.

उपकर्णधार रोहित शर्माचा सातवा टी-२० विश्वचषक असेल
रोहित शर्मा अातापर्यंत झालेल्या सर्व टी-२० विश्वचषकात भारतीय संघाचा सदस्य आहे. रोहितसह केवळ धोनीने सर्व स्पर्धा खेळल्या. आता रोहित सातव्या विश्वचषकात उतरेल, तो सर्व विश्वचषक खेळणारा एकमेव भारतीय बनेल. लोकेश, सूर्यकुमार, पंत, ईशान, राहुल, अक्षर व वरुणचा पहिला विश्वचषक असेल.

२०१९ विश्वचषकातील ३ वेगवान गोलंदाज
वेगवान गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराह, मो. शमी व भुवनेश्वर कुमारला संघात स्थान मिळाले. २०१९ एकदिवसीय विश्वचषकाच्या भारतीय संघात तिघांचा समावेश होता. सर्वांनी भारतासाठी केवळ १२ टी-२० सामने खेळले. राखीवमध्ये शार्दूल ठाकूर व दीपक चहर आहे.

बातम्या आणखी आहेत...