आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रिकेट:टी-20 वर्ल्डकपची स्थगिती जवळपास निश्चित; नोव्हेंबरमध्ये आयपीएलला आयोजनाची संधी

मेलबर्न/दुबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात हाेणार आहे विश्वचषक स्पर्धा

कोरोनामुळे टी-२० विश्वचषक स्थगित होणे निश्चित आहे. त्याची अधिकृत घोषणा पुढील आठवड्यात होऊ शकते. २८ मे रोजी आयसीसीची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होईल. अशात या स्पर्धेच्या आयाेजनाबाबत २८ मे किंवा त्यापूर्वी कोणता निर्णय येण्याची शक्यता आहे. या बैठकीत आयसीसीच्या अध्यक्ष निवडीवरदेखील चर्चा होऊ शकते. अध्यक्ष शांक मनोहर यांचा कार्यकाळ या महिन्यात समाप्त होईल. ऑस्ट्रेलियात स्पर्धा होणार असेल तर सर्व १६ संघांना क्वाॅरंटाइनमध्ये राहावे लागेल.

स्मिथच्या प्रतिक्रियेवर सीएसएची नाराजी

क्रिकेट दक्षिण आफ्रिका (सीएसए) आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी सौरव गांगुलीला पाठिंबा असल्याच्या ग्रीम स्मिथच्या प्रतिक्रियेशी सहमत नाही. सीएसएचे अध्यक्ष क्रिस नेनजानीने म्हटले की, कोणत्या उमेदवाराचे समर्थन करण्यापूर्वी आपण आयसीसी आणि स्वत:च्या नियमांचा सन्मान करायला हवा. त्यांनी म्हटले की, आतापर्यंत कोणताच उमेदवार जाहीर केलेला नाही आणि उमेदवार निश्चित झाल्यानंतर सीएसए मंडळ आपल्या नियमानुसार निर्णय घेईल.

स्थगितीच्या निर्णयाशी संबंध नाही : बीसीसीआय

विश्वचषकाला स्थगित करण्यामागे आम्ही नाही. ऑस्ट्रेलियाच्या मध्यातील अहवालानुसार बीसीसीआय क्रिकेट ऑस्ट्रेलियन क्रिकेटवर विश्वचषक स्थगित करण्यासाठी दबाव टाकत आहे. कारण आयपीएलला संधी मिळावी. कोषाध्यक्ष अरुण धुमळने म्हटले की, आम्ही विश्वचषक स्थगित करण्याचा सल्ला का द्यावा. आयसीसीच्या बैठकीत चर्चा होईल व तेच निर्णय घेतील. यासाठी काेणताही दबाव नाही.

या तीन पर्यायांवर होऊ शकते चर्चा; यातून नवीन पर्याय उपलब्ध

1. क्रिकेट ऑस्ट्रेलियाला विश्वचषक फेब्रुवारी-मार्चमध्ये आयोजनास अडचण नाही. मात्र, खेळाडूंवर ताण वाढू शकतो. एप्रिलमध्ये आयपीएल होत असते.

2. बीसीसीआय २०२१ मध्ये टी-२० विश्वचषक आयोजनास तयार आहे. २०२२ मध्ये येेथे आयोजन करु शकेल. यात अडचण ही आहे की, बीसीसीआय व सीए यांच्यात वर्षअखेरीस कसोटी मालिका आयोजनावर चर्चा चालू आहे.

3. ऑस्ट्रेलिया २०२० ऐवजी २०२२ मध्ये विश्वचषकाचे आयोजन करेल. जर असे झाल्यास जास्तीत जास्त खेळाडू व आयसीसी मान ठेवू शकतो. २०२२ मध्ये आयसीसीची कोणती स्पर्धा देखील नाही.

बातम्या आणखी आहेत...