आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकन क्रिकेटमध्ये टेक्‍नॉलॉजीचा दबदबा:मेजर लीगसाठी होऊ शकतो पॉवर बॅटचा वापर; हायटेक गॅजेट्सच्या मदतीने दुखापतीचा अंदाज

अमेरिकन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रिकेटच्या विश्वात आता अमेरिकेनेही आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी सध्या अमेरिकन क्रिकेटमध्ये नव्या तंत्रप्रणालीचे वारे वेगाने वाहत आहे. पुढच्या वर्षी अमेरिकेमध्ये झटपट क्रिकेटच्या टी-२० फॉरमॅटची लीग होणार आहे. त्यामुळेच अमेरिकेमध्ये क्रिकेटला चालना देणारी वातावरण निर्मिती झाली आहे. याच लीगला हायफाय करण्यासाठी जगभरातील नामांकित टेक कंपन्यांनीही कंबर कसली. यातून आता अमेरिकन क्रिकेटमध्ये नव्या टेक्‍नॉलॉजीचा समावेश करण्यात आला. यातून या ठिकाणी मेजर लीगदरम्यान पॉवर बॅटचा वापर करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. याशिवाय खेळाडूंना मैदानावर होणाऱ्या दुखापतीची माहिती पुरवणारीही तंत्रप्रणाली विकसित करण्यात आली. त्यामुळे आता हायटेक गॅजेट्सच्या माध्यमातून क्रिकेटपटूंना होणाऱ्या दुखापतीचा अचूक असा अंदाज बाधता येणार आहे. अमेरिकेतील टी-२० लीगचे पुढच्या वर्षी अनावरण करण्यात येईल. याच लीगमध्ये नामांकित टेक कंपनी मायक्रॉसॉफ्ट आणि एडॉब कंपनीने कोट्यवधी रुपयांची आर्थिक गुंतवणूक केली आहे. त्यामुळे भव्य स्वरुपातील अमेरिकेत टी-२० लीगचे आयोजन करण्याचा मार्ग सुकर होणार आहे. याशिवाय अमेरिकन क्रिकेट संघानेही आता गुणवंत खेळाडूंच्या प्रतिभेला चालना देण्यासाठी खास प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी पाच वर्षात अमेरिका टीमला जागतिक स्तरावरील क्रिकेटच्या वि‌श्वात आपला दबदबा निर्माण करायचा आहे.

अपूर्व अशा तंत्रप्रणालीचा वापर : मायक्रॉसॉफ्टच्या एआयच्या पॉवर बॅट, सरफेस टॅब्लेट्स (लाइव्ह सामन्यादरम्यान डावपेच आखण्यास कोचला मदतगार), स्‍पोर्ट्स परफॉरमन्स प्लॅटफॉर्म (दुखापतीची माहिती मिळेल), हायटेक हार्डवेअर व सॉफ्टवेअरचाही वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे याच तंत्रप्रणालीचा वापर आता होणार आहे. त्यामुळे याचा मोठा फायदा यादरम्यान होणार आहे. या प्रणालीमुळे खेळाडूंना दुखापतीतूनही सावरता येईल.

मायक्रॉसॉफ्ट सरफेस टॅब्लेट्स : फुटबॉल व बेसबॉल सामन्यात होतो प्रयोग
या तंत्रप्रणालीचा वापर हा फुटबॉल आणि बेसबॉलच्या सामन्यादरम्यान केला जातो. त्यामुळे याचा प्रयोग अमेरिकेतील मेजर क्रिकेट लीगमध्ये होणार आहे. याच्या आधारे संघाचे प्रशिक्षक आणि खेळाडू हे सामन्यादरम्यान विजयासाठीचे मजबूत असे डावपेच आखू शकणार आहेत. याशिवाय खेळाडूंना होणाऱ्या दुखापतीचा धाेका टाळण्यासाठीही खास टेक्नालॉजी विकसित झाली आहे. यासठी मशीन लर्निंग आणि प्रेडिक्टिव्ह अॅनालिटिक्सचा वापर होणार आहे. यातून खेळाडूंना होणारी आणि झालेली दुखापत सहज माहिती पडणार आहे. याच टॅब्लेट्सच्या आधारे आता प्रत्येक खेळाडूंना आपापली मैदानावरील कामगिरी निश्चित करता येणार आहे. तसेच कोचने दिलेल्या सूचनेनुसार खेळाडू हे खेळताना दिसतील.

स्‍पोर्ट्स परफॉरमन्स प्लॅटफॉर्म : वर्कलोड मॅनेज करून दैनंदिन कसून सराव
या टेक्‍नॉलॉजीच्या आधारे प्रशिक्षक आणि ट्रेनर्स हे खेळाडूच्या दुखापतीची परिपूर्ण माहिती घेऊ शकणार आहेत. यातून संबंधित खेळाडूला वर्कलोड मॅनेजच्या माध्यमातून नियमित सराव करता येईल. याशिवाय या तंत्रप्रणालीच्या माध्यमातून खेळाडूंच्या शारीरिक थकव्याचीही माहिती समोर येणार आहे. त्यामुळे त्याला देण्यात येणाऱ्या विश्रांतीवरही विचार केला जाईल. क्रिकेट ऑस्ट्रेलिया, पाेर्तुगालचे एसएल बेनफिका आणि अमेरिकेतील अनेक कॉलेज याच तंत्र प्रणालीचा वापर करतात. तसेच अनेक फुटबॉल क्लब याचा वापर करतात.

पॉवर बॅट्स
पॉवर बॅट्स

पॉवर बॅट्स : कुंबळेच्या स्टार्टअपमधून विकसित प्रणाली
मेजर क्रिकेट लीगमध्ये आता पॉवर बॅट्सचा वापर केला जाईल. ही पॉवर बॅटची संकल्पना भारताचे माजी कर्णधार अनिल कुंबळे यांच्या स्टार्टअपमधून यशस्वीपणे साकारण्यात आली. कुंबळे यांच्या संकल्पनेला मायक्रॉसॉफ्ट कंपनीने वास्तव्यात आणले आहे. त्यमाुळे या बॅटच्या माध्यमातून खेळाडूंना आपल्या रियल टाइम सर्वाेत्तम कामगिरीचा डेटा उपलब्ध होणार आहे. चेंडूचा वेग, त्यावरील फटका, परफेक्ट शाॅटची गुणवत्ता यातून सिद्ध होणार आहे. या बॅटवर एक स्टिकर असेल. यातून मारलेला फटका, या स्टिकरच्या माध्यमातून डाटा संकलित करणार आहे.

बातम्या आणखी आहेत...