आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सलामीच्या पराभवातून सावरलेला यजमान भारतीय संघ आता विजयी ट्रॅकवर येण्याच्या इराद्याने रविवारी अहमदाबादच्या मैदानावर उतरणार आहे. टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात आज दुसरा टी-२० सामना रंगणार आहे. सलामी सामना जिंकून इंग्लंड संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. टीम इंडियाला सलामी सामन्यातील पराभवाने माेठा धक्का बसला. यातून कसोटी मालिकेतून सुरू झालेल्या भारताच्या विजयी मोहिमेला ब्रेक लागला. मात्र, कर्णधार विराट कोहलीने सलामीच्या पराभवाचे खापर खेळपट्टीवर फाेडले. ही खेळपट्टी सुमार असल्याची प्रतिक्रिया त्याने दिली. मात्र, खऱ्या अर्थाने टीम इंडियाला या खेळपट्टीचा अद्याप अचूक असा अंदाज आलेला नाही. या पिचवर अतिरिक्त वेगवान गोलंदाजांना संधी देणे फायदेशीर ठरले असते. मात्र, भारतीय संघाने तीन फिरकीपटूंना संधी दिली.
काेहलीचा फाॅर्म चिंतेचा : टीम इंडियाचा कर्णधार विराट काेहली पुन्हा एकदा फिरकीच्या जाळ्यात अडकला. त्यामुळे त्याच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह निर्माण हाेत आहे. दीर्घ काळापासून त्याला टी-२० फाॅरमॅटमध्ये माेठी खेळी करता आलेली नाही. त्याचा हा फाॅर्म टीम इंडियासाठी चिंतेत टाकणारा आहे. त्याला आता आपल्या कामगिरीचा दर्जा उंचावण्याची गरज आहे
थेट आक्रमणाचा आता पवित्रा :
भारतीय संघाचे फलंदाजांनी आता नव्या पवित्र्यासह मैदानावर खेळी करण्याची शैली आत्मसात केली. त्यानुसार टीम इंडियाचे फलंदाज हे मैदानावरील परिस्थितीचा कुठल्याही प्रकारे अंदाज न घेता थेट पहिल्याच चेंडूपासून आक्रमक खेळी करण्यावर भर देत आहेत. यातून प्रत्येक चेंडूवर फटका मारण्यासाठी फलंदाज आपली क्षमता खर्च करत आहेत.
सूर्यकुमार-सैनीला मिळू शकेल संधी
विजयी ट्रॅकवर येण्यासाठी टीम इंडिया आता दुसऱ्या सामन्यात फलंदाज सुर्य कुमार यादव आणि वेगवान गोलंदाज नवदीप सैनीला संधी देण्याची शक्यता आहे.यातून काेण्या एका फिरकीपटूला विश्रांती देण्यात येईल. युजवेंद्र चहलच्या जागी युवा खेळाडू राहुल तेवाटियाला संधी मिळू शकेल. कारण, हा युवा खेळाडू स्फाेटक फलंदाज आहे. त्याने आयपीएल स्पर्धेदरम्यान या फाॅरमॅटमधील आपली क्षमता सिद्ध केली आहे. त्यामुळे आता त्याच्याकडून या मालिकेत स्फाेटक फलंदाजीची माेठी आशा टीमला आहे. टीम इंडियाच्या विजयाची मदार आता एक्स फॅक्टर म्हणजेच मॅच विनर खेळाडूंवर आहे. यामध्ये यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत, हार्दिक पांड्यासारखे युवा खेळाडूंवर माेठी अपेक्षा आहे. यांच्याकडून माेठ्या खेळीची आशा आहे. सलामीच्या सामन्यामध्ये दोघेही फार काळ मैदानावर आव्हान कायम ठेवू शकले नाहीत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.