आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • The Softening Of The Franchise At The Suggestion Of Mahendra Singh Dheni; Chance Decision For Jadeja

वादावर पडदा; जडेजा चेन्नईकडूनच खेळणार:महेंद्रसिंग धाेनीच्या सूचनेने फ्रँचायझीची नरमाई; जडेजाला संधीचा निर्णय

मुंबई24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडियाचा ऑलराउंडर रवींद्र जडेजा आणि आयपीएल टीम चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यातील वादावर अखेर पडदा पडला. त्यामुळे ताे आगामी आयपीएलमध्ये चेन्नई संघाकडून खेळताना दिसणार आहे. यादरम्यान अॅडम मिल्ने आणि क्रिस जाॅर्डनला रिलीज करण्यात येणार आहे.कर्णधार महेंद्रसिंग धाेनीने या प्रकरणात मध्यस्थी केली. त्याने फ्रँचायझीला जडेजाला काेणत्याही प्रकारे रिलीज करण्यात येऊ नये, अशा प्रकारच्या सूचना केल्या हाेत्या. यामुळे फ्रँचायझीनेही नरमाई दाखवत जडेजाला आपल्या साेबत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. यातून आता आगामी १५ व्या सत्रामध्ये जडेजा हा चेन्नई संघाकडून खेळताना दिसणार आहे. हाेम लेगवर जडेजाच्या कामगिरीचा निश्चितपणे संघाला माेठा फायदा हाेणार आहे. अशा परिस्थितीमध्ये जडेजाची अनुपस्थिती ही संघाला महागात पडू शकेल, असेही त्याने फ्रँचायझीला समजून सांगितले. मात्र, फ्रँचायझीने आता अॅडम मिल्ने व क्रिस जाॅर्डन यांना रिलीज करण्याची तयारी दर्शवली आहे.

बातम्या आणखी आहेत...