आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला खराब फॉर्म आणि दुखापतीमुळे टी-20 विश्वचषकानंतर टीम इंडियातून बाहेर व्हावे लागले. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तब्बल 6 महिन्यांनंतर तो संघात पुनरागमन करत आहे. हार्दिकने सांगितले की, या काळात त्याने लोकांचे टोमणे ऐकून खूप मेहनत घेतली, त्यामुळेच तर तो टीम इंडियामध्ये परत येऊ शकला.
BCCI TV ला दिलेल्या मुलाखतीत त्याने आपला 6 महिन्यांचा संपूर्ण प्रवास सांगितला आहे. तो काय म्हणाला ते पाहुया…
IPL च्या विजयाची आठवण करून देताना हार्दिक म्हणतो, 'मी खूप आनंदी आहे. हा विजय माझ्या स्वत:शी झालेल्या लढाईतला विजय आहे. IPL जिंकणे आणि टीम अंडियासाठी पात्रता मिळवणे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. माझ्या क्षमतेवर अनेकांना शंका होती. अनेकांनी माझ्यावर अनेक प्रश्नही उपस्थित केले. माझ्याबद्दल अनेक गोष्टी बोलल्या गेल्या आहेत. मी परत येण्यापूर्वीच हे सारे घडत होते.'
गेल्या वर्षी झालेल्या टी-20 विश्वचषकानंतर हार्दिक भारतीय संघाचा भाग नव्हता. IPL पूर्वी त्याने सरावात खूप घाम गाळला. हार्दिक सांगतो की तो पहाटे 5 वाजता उठायचा आणि रात्री साडेनऊपर्यंत झोपायचा जेणेकरून दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा त्याला सराव करता येईल.
तो म्हणतो, 'मला कधीही कोणाला उत्तर द्यायचे नव्हते. मी ज्या प्रक्रियेतून गेलो त्याचा मला अभिमान आहे. त्या 6 महिन्यांत मी काय पाहिले हे कुणालाच माहीत नाही. मला सराव करता यावे म्हणून मी पहाटे 5 वाजता उठायचो. सलग 4 महिने ते रात्री साडेनऊ वाजता झोपायचो यासाठी मी खूप त्याग केला आहे.
IPL पूर्वीची ही माझीलढाई सुरु होती, जी मी लढत होतो. मी माझ्या आयुष्यात नेहमीच खूप मेहनत केली आहे. मेहनत केल्याने मला नेहमी माझ्या मनाप्रमाणे फळ मिळाले आहे.
IPLमधील सर्वोत्तम फलंदाजीनंतर हार्दिकने राष्ट्रीय संघात पुनरागमन केले आहे. त्याचा संघ गुजरात टायटन्सनेही अंतिम फेरीत राजस्थान रॉयल्सचा पराभव करून IPL 2022 चे विजेतेपद पटकावले. त्याचबरोबर पंड्याने गुजरातसाठी सर्वाधिक धावा केल्या. हार्दिक पंड्याने गुरुवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 12 चेंडूत 31 धावांची नाबाद खेळी खेळली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.