आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रिकेट:पाच वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सची जिद्द ही भारताच्या टी-20 टीमला शिकवण देणारी ठरेल

चंद्रेश नारायणन | दुबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मर्यादित षटकांचे सामने खेळणाऱ्यांना टी-20 मधून वगळावे

मुंबई इंडियन्सचा विजय फ्रँचायझीला जगात सर्वात प्रभावी टी-२० टीम बनवते. मात्र, सर्वाधिक चर्चा राहिली ती राेहित शर्माच्या स्पर्धेतील सर्वात मोठ्या विजयी खेळीची. त्याच्या नेतृत्वात मुंबईने पाचव्यांदा ही ट्रॉफी जिंकली. दुसरीकडे, रोहित एकूण ६ आयपीएल ट्रॉफी जिंकला आहे (२००९ मध्ये डेक्कन चार्जर्ससाठी). अपेक्षेप्रमाणे पुन्हा एकदा रोहितला भारतीय टी-२० संघाचा कर्णधार बनवण्याची मागणी होत आहे. ज्यात अनेक माजी खेळाडूदेखील आहेत. त्याचे कारण रोहितचे पाच वेळा सर्वाधिक टी-२० लीगचा कर्णधार म्हणून जिंकणे आहे. त्याने आपल्या नेतृत्वगुणांची झलक गेल्या आठ वर्षांत दाखवली.

त्याचप्रमाणे विराट कोहलीची तिजोरी अद्याप रिकामी आहे. त्यालाही या लीगमध्ये उल्लेखनिय कामगिरीच्या आधारे फायनलचा पल्ला गाठता आला नाही. त्यामुळे हा संघही रिकाम्या हाताने या लीगमधून बाहेर पडला. यासह टीमला यंदा चाैथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

विराट काेहलीने आपल्या कुशल नेतृत्व आणि उल्लेखनिय खेळीतून आतापर्यंत अनेक टी-२०, वनडे आणि कसोटीतील अनेक द्विपक्षीय मालिका जिंकल्या आहेत. अद्याप मोठ्या स्पर्धेची ट्रॉफी मिळवली नाही. गत तीन वर्षांत भारतीय टीमने निदहास ट्रॉफी आणि आशिया कप जिंकला. दोन्हीत कर्णधार रोहित होता. त्यामुळे टी-२० कर्णधार बदलण्याची मागणी योग्य आहे. भारतासाठी टी-२० क्रिकेटला वनडे क्रिकेटपासून वेगळे करण्याची वेळ आली आहे. दोन्ही प्रकारातील दरी वाढत आहे. तुम्ही दोन्हीला पांढऱ्या चेंडूचे क्रिकेट म्हणू शकत नाही. विशेष टी-२० संघ बनवण्याची गरज आहे. ज्यात कर्णधारही नवा असेल. कारण, या प्रकारासाठी विशेष कौशल्याची गरज असते. वरुण चक्रवर्ती व टी. नटराजनसह वॉशिंग्टन सुंदरला स्थान मिळणे त्या गोष्टीकडे इशारा करते. खरे तर विराट कोहलीने अद्याप कोणत्याही टी-२० स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व केले नाही. तो कर्णधार झाल्यानंतर केवळ निदहास ट्रॉफी झाली. त्यात त्याला विश्रांती देण्यात आली होती. टी-२० मध्ये त्याच्या नेतृत्वाची तुलना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या कामगिरीशी होते. गत टी-२० विश्वचषकात महेंद्रसिंग धोनी कर्णधार असलेली टीम इंडिया स्फोटक वेस्ट इंडीजकडून पराभूत झाली होती.

भारतीय टी-२० टीम अनेक वेळा वनडेसारखे खेळते. मात्र, इंग्लंड, न्यूझीलंडची टीम असे करत नाही. टीम इंडियाला आघाडीला आणि तळाला स्फोटक फलंदाजांची गरज आहे. गोलंदाजीतही वेगळे कौशल्य असलेले व बळी घेणारे खेळाडू हवेत. आपल्याला लवकरात लवकर असे करावे लागेल, अन्यथा आपली टीम खूप मागे पडू शकते. विशेष म्हणजे युवा खेळाडूंसह २००७ मध्ये पहिला टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतरही आपण या छोट्या गोष्टीकडे लक्ष्य देऊ शकलाे नाही. त्या वेळी भारताने टी-२० ची वेगळी टीम निवडली होती आणि विजेता बनला होता. त्यानंतर आपण टी-२० साठी वनडेची टीम निवडत आहे. भारतासाठी टी-२० क्रिकेटला पुन्हा रुळावर आणण्याची वेळ आली. पुढील टी-२० विश्वचषकाला एक वर्षाचा कार्यकाळ आहे. त्यानंतर पुन्हा एक वर्षाने टी-२० विश्वचषक होईल. त्यामुळे आताच तयारी सुरू केली पाहिजे. चांगला कसोटीपटू सर्व प्रकारात चांगला खेळाडू होऊ शकतो हे गणित टी-२० साठी योग्य नाही. रोहितच्या मुंबईने दाखवून दिले की, फलंदाजीत प्रत्येक ठिकाणी स्फोटक फलंदाज असतील तर काय फायदा होतो. त्यामुळे आपल्याला प्रवाहासोबत चालावे लागेल आणि बुडण्यासाठी तयार राहावे लागेल.

बातम्या आणखी आहेत...