आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेट:महिला विश्वचषकात विंडीजची प्रथमच इंग्लंडच्या महिला संघावर मात

ड्युनेडिन7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिला विश्वचषक स्पर्धेतील गतविजेत्या इंग्लंडचा वेस्ट इंडीजकडून ७ धावांनी पराभव झाला. वेस्ट इंडीजने वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच इंग्लंडला हरवले. नाणेफेक जिंकून प्रथम खेळताना वेस्ट इंडीजने ६ बाद २२५ धावा उभारल्या. विंडीजच्या शिमॅन कॅम्पबेल व चेडियन नेशनने पाचव्या गड्यासाठी १२३ धावांची भागीदारी रचली. सोफी एक्लेस्टोनने २० धावा देत ३ बळी घेतले. प्रत्युत्तरात इंग्लंड ४७.७ षटकांत २२६ धावा करू शकला. सलामीवीर टेमी ब्युमोंटने इंग्लंडसाठी सर्वाधिक ४६ धावा केल्या. डॅनी वायट (३३) व सोफी डंकलीने (३८) सहाव्या गड्यासाठी ६० धावांची भागीदारी केली. कॉनेलने १० षटकांत १ निर्धाव टाकत ३ बळी घेतले. कॅम्पबेल सामनावीर ठरली. चालू स्पर्धेत विंडीजचा सलग दुसरा विजय ठरला.

आज न्यूझीलंडशी भारत भिडणार
विश्वचषकाच्या नवव्या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड गुरुवारी हॅमिल्टनच्या सेडन पार्क स्टेडियमवर भिडतील. पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानला १०७ धावांनी हरवले होते. न्यूझीलंडने आपले पहिले दोन सामने गमावले आहेत. विश्वचषकात दोन्ही संघांचा आतापर्यंत १२ सामना झाले आहेत. यात न्यूझीलंडने ९ वेळा विजय मिळवला, तर भारत केवळ २ वेळा जिंकला आहे

बातम्या आणखी आहेत...