आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईचा फलंदाज यशस्वीने रणजी ट्रॉफीमध्ये उत्तर प्रदेशविरुद्ध उपांत्य सामन्यातील दाेन्ही डावांत शतकी खेळी केली. त्याने पहिल्या डावात १०० व दुसऱ्या डावात नाबाद १६३ धावा काढल्या.
-यशस्वीने उत्तर प्रदेशविरुद्ध सामन्याच्या दुसऱ्या डावात ५३ चेंडू खेळल्यानंतर धावेचे खाते उघडले. त्याने अंकितच्या चेंडूवर चौकार मारला. त्यानंतर त्याने सहकारी खेळाडूंना अभिवादन करत थेट नाबाद १६३ धावांचा पल्ला गाठला.
-यशस्वी हा लिस्ट ‘ए’ मध्ये द्विशतक करणारा सर्वात युवा खेळाडू ठरला. त्याने १६ ऑक्टाेबर २०१९ मध्ये विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत झारखंडविरुद्ध १५४ चेंडूंत २०३ धावा काढल्या होत्या. यादरम्यान त्याचे वय १७ वर्षे २९२ दिवस होते.
-यशस्वी हा वयाच्या दहाव्या वर्षापासून क्रिकेटच्या मैदानावर खेळत आहे. त्याला वयाच्या ११ व्या वर्षी क्रिकेटच्या खास प्रशिक्षणासाठी अकादमीमध्ये दाखल करण्यात आले, अशी माहिती वडील भूपेंद्रकुमार यांनी दिली.
-यशस्वीने युवांच्या १९ वर्षांखालील कसाेटीत आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या डावात १७३ धावा काढल्या होत्या. यात २४ चौकारांची नोंद होती. इतर खेळाडूंनी एकूण २४ चौकार मारले.
-यशस्वीने २६ लिस्ट ए सामन्यात ४८.४७ च्या सरासरीने १११५ धावा काढल्या. यामध्ये तीन शतकांसह पाच अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच्या नावे ७ विकेटची नोंद आहे.
-यशस्वी हा २०२० मध्ये १९ वर्षांखालील टी-२० च्या विश्वचषक स्पर्धेत भारताचा टॉप स्कोअरर फलंदाज होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.